Fire in MHADA building; Both serious | म्हाडा इमारतीत आग; दोघी गंभीर
म्हाडा इमारतीत आग; दोघी गंभीर

मुंबई : मालवणीच्या म्हाडा परिसरात असलेल्या इमारतीतील फ्लॅटमध्ये गुरुवारी पहाटे आग लागली. या आगीमध्ये सहा वर्षांच्या चिमुरडीसह तिची आईदेखील भाजली. त्यांना स्थानिक खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दोघींचीही प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
निलोफर शेख (३२) आणि त्यांची मुलगी इकारा शेख (६) अशी आगीत होरपळलेल्या मायलेकींची नावे आहेत. मालवणी म्हाडाच्या गेट क्रमांक ८जवळ साईसदन इमारत आहे. इमारतीतील बी विंगमध्ये शेख कुटुंबीय राहते. गुरुवारी सकाळी साडे पाचच्या सुमारास शेख यांच्या घरातील एलपीजी सिलिंडरमधून गॅस लिक होऊन आग लागली. यात मायलेकी होरपळल्या. ही बाब शेजाºयांच्या लक्षात येताच त्यांनी आग विझवली. आगती आई निलोफर ८० टक्के तर मुलगी इकारा ३० टक्के भाजली आहे. दोघींचीही प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.


Web Title: Fire in MHADA building; Both serious
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.