...अखेर बसुवाला कंपाउंडमध्ये संरक्षक भिंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 02:41 AM2018-05-19T02:41:43+5:302018-05-19T02:41:43+5:30

मालाड पूर्व पठाणवाडी येथील बसुवाला कंपाउंडमधील सुमारे १५० अल्पसंख्याक कुटुंबांना शिवसेनेने दिलासा दिला आहे.

Finally, the guard walls in Basuva compound | ...अखेर बसुवाला कंपाउंडमध्ये संरक्षक भिंत

...अखेर बसुवाला कंपाउंडमध्ये संरक्षक भिंत

Next

मुंबई : मालाड पूर्व पठाणवाडी येथील बसुवाला कंपाउंडमधील सुमारे १५० अल्पसंख्याक कुटुंबांना शिवसेनेने दिलासा दिला आहे. मालाड पूर्व पठाणवाडी येथील बसुवाला कंपाउंडमधील रहिवाशांना पावसाळ्यात संरक्षक भिंत मिळणार असल्यामुळे ते आता निर्धास्त असणार आहेत. बसुवाला कंपाउंड चाळ क्रमांक बी-२ व बी-३ या चाळींवर सन २०१७ व २०१८ मधील पावसाळ्यात डोंगर खचून वित्त हानी झाली होती. नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. मागील दोन-तीन वर्षांपासून रात्री डोंगर खचून घरांवर पडून आपण त्याखाली दबले जाऊ या भीतीपोटी पावसाळ्यात येथील नागरिक जागरण करायचे.
खासदार गजानन कीर्तिकर यांच्या सूचनेनुसार शिवसेनेचे आमदार सुनील प्रभू यांनी म्हाडाकडून निधी उपलब्ध करून घेतला. शुक्रवारी दुपारी प्रभू यांच्या हस्ते या संरक्षक भिंतीच्या कामाची सुरुवात झाली.
तब्बल ६० मीटर लांब असणाऱ्या या संरक्षक भिंतीची उंची आठ फूट असणार आहे. या संरक्षक भिंतीमुळे पंचवीस ते तीस कुटुंबांतील रहिवाशांना कायमस्वरूपी दिलासा मिळणार आहे.

Web Title: Finally, the guard walls in Basuva compound

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.