निवडणुका २ महिन्यांतही लागू शकतात! - संजय राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2018 04:18 AM2018-01-31T04:18:16+5:302018-01-31T04:18:32+5:30

देशातील वातावरण बघता दोन महिन्यांतही निवडणुका लागू शकतात, असे वक्तव्य खासदार व शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे. दिंडोशी येथील क्रीडांगण आणि व्यायाम शाळेच्या लोकार्पण सोहळ्यावेळी ते बोलत होते.

Elections can take even in 2 months! - Sanjay Raut | निवडणुका २ महिन्यांतही लागू शकतात! - संजय राऊत

निवडणुका २ महिन्यांतही लागू शकतात! - संजय राऊत

Next

मुंबई : देशातील वातावरण बघता दोन महिन्यांतही निवडणुका लागू शकतात, असे वक्तव्य खासदार व शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे. दिंडोशी येथील क्रीडांगण आणि व्यायाम शाळेच्या लोकार्पण सोहळ्यावेळी ते बोलत होते.
सोहळ्यातील भाषणात आमदार सुनील प्रभू यांनी ‘अजून आमदारकीच्या निवडणुकीला दोन वर्षे बाकी आहे. त्यामुळे येथील विकास कामांसाठी आपला खासदार निधी द्यावा’, अशी मागणी केली. हाच धागा पकडून राऊत म्हणाले की, ‘दोन वर्षे काय घेऊन बसलात? दोन महिन्यांतही निवडणुका होतील. महाराष्ट्राचा निकाल काही लागो, मात्र दिंडोशीत भगवा फडकणार असा ठाम विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. क्रीडांगण आणि व्यायामशाळा या दोन्ही वास्तूंची देखभाल करण्याची जबाबदारी न्यू दिंडोशी रॉयल हिल्स को- आॅप सोसायटीकडे सोपवण्यात आली आहे. येथील १४ हजार चौरस फूट विस्तीर्ण क्रीडांगण आणि ५०० चौरस फूट व्यायामशाळा संस्थेला हस्तांतरण करण्यास म्हाडाने ‘ना हरकत प्रमाणपत्र’ दिले आहे.
 

Web Title: Elections can take even in 2 months! - Sanjay Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.