आॅनलाइन फार्मसीला संघटनांकडूनच औषधे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 06:40 AM2018-10-21T06:40:53+5:302018-10-21T06:40:55+5:30

केंद्राने आॅनलाइन फार्मसीकरिता धोरण आखण्याची तयारी करत मसुदा तयार केला.

Drugs from the online pharmacy alone | आॅनलाइन फार्मसीला संघटनांकडूनच औषधे

आॅनलाइन फार्मसीला संघटनांकडूनच औषधे

Next

मुंबई : केंद्राने आॅनलाइन फार्मसीकरिता धोरण आखण्याची तयारी करत मसुदा तयार केला. त्यावर सूचना, हरकतींची प्रक्रिया सुरू होती. मात्र, नुकताच आॅल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने याला विरोध करीत बंद पुकारला. दुसरीकडे याच संघटनांशी संलग्न महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन संघटनेचा जिल्हास्तरीय विभाग आॅनलाइन फार्मसीला औषध पुरवठा करत असल्याचा आरोप महाराष्ट्र रजिस्टर्ड फार्मासिस्ट असोसिएशनने केला.
काही दिवसांपूर्वी पुणे येथील महाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोएिशनशी संलग्न केमिस्ट असोसिएशन आॅफ पुणे संघटनेने अन्न व औषध प्रशासनाला पत्र लिहून आॅनलाइन फार्मसीला पुरवठा केल्यास, त्यासंबंधी कारवाई करू नका, असे कळविले आहे. त्याविषयी, संबंधित आॅनलाइन फार्मसी कंपनीला दोषी धरावे, असेही त्यात म्हटले आहे.
मात्र, आॅल इंडिया ड्रगिस्ट अँड केमिस्ट असोसिएशनने दीड वर्षांपूर्वी मेडिलाइफ या आॅनलाइन फार्मसीसह करार केला. संघटनेतील काही सदस्य आॅनलाइन फार्मसीला घाऊक औषधे पुरवत असल्याचा आरोप महाराष्ट्र फार्मासिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष कैलास तांदळे यांनी केला आहे.
एका बाजूला विरोध आणि दुसरीकडे औषधपुरवठा करायचा, अशी भूमिका या संघटनांनी घेऊ नये, असे तांदळे यांनी सांगितले.

Web Title: Drugs from the online pharmacy alone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.