राधे माँसह सात जणांवर हुंडाबळीचा गुन्हा

By admin | Published: July 28, 2015 02:48 AM2015-07-28T02:48:01+5:302015-07-28T02:48:01+5:30

स्वयंघोषित देवी राधे माँ हिच्यासह एकाच कुटुंबातील एकण सात जणांवर शनिवारी कांदिवली पोलिसांनी हुंडाबळीचा गुन्हा नोंदवला. निकी गुप्ता या ३२ वर्षांच्या विवाहित तरुणीने

Dowry offense with seven people including Radhe Maa | राधे माँसह सात जणांवर हुंडाबळीचा गुन्हा

राधे माँसह सात जणांवर हुंडाबळीचा गुन्हा

Next

मुंबई : स्वयंघोषित देवी राधे माँ हिच्यासह एकाच कुटुंबातील एकण सात जणांवर शनिवारी कांदिवली पोलिसांनी हुंडाबळीचा गुन्हा नोंदवला. निकी गुप्ता या ३२ वर्षांच्या विवाहित तरुणीने केलेल्या तक्रारीनुसार राधे माँच्या सांगण्यावरून सासरची मंडळी हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक छळ करीत होती.
पती नकुल व तिच्या सासरची मंडळी लता गुप्ता, दौलतकुमार गुप्ता, संदीप गुप्ता, ज्योती गुप्ता आणि जगमोहन गुप्ता हे तिचा हुंड्यासाठी छळ करीत असल्याचे तसेच तिला शिवीगाळ करून टोमणे मारत असल्याचे निकीने तक्रारीत म्हटले आहे. लग्नात पालकांनी १ कोटी रुपये खर्च करूनही सासरच्यांना हुंडा हवा होता. सासरची मंडळी सुखविंदर कौर ऊर्फ राधे माँचे भक्त असून तिच्याच सांगण्यावरून छळ करीत होते, असा आरोपही निकीने केल्याची माहिती पोलीस देतात. बोरीवली दंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशानंतर शनिवारी या सर्वांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. निकी आणि तिच्या कुटुंबीयांचे जबाब नोंदविण्याचे काम सुरू आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, अशी माहिती कांदिवली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुकुंद पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

Web Title: Dowry offense with seven people including Radhe Maa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.