शिवस्मारकाच्या कामाला अपशकुन, सरकारची नाचक्की

By अतुल कुलकर्णी | Published: October 26, 2018 04:23 AM2018-10-26T04:23:10+5:302018-10-26T04:23:19+5:30

स्मारकाचे भूमिपूजन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर थेट काम सुरु करायचे सोडून समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी अतिउत्साह दाखवल्याने फडणवीस सरकारची नाचक्की झाली.

Dissatisfied with the work of Shiv Samrak, the government's Impersonation | शिवस्मारकाच्या कामाला अपशकुन, सरकारची नाचक्की

शिवस्मारकाच्या कामाला अपशकुन, सरकारची नाचक्की

googlenewsNext

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अरबी समुद्रातील स्मारकाचे भूमिपूजन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्यानंतर थेट काम सुरु करायचे सोडून समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी अतिउत्साह दाखवल्याने फडणवीस सरकारची नाचक्की झाली. कालच्या दुर्घटनेवरून विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले, तर भाजपाच्या एका ज्येष्ठ मंत्र्याने देखील तीव्र नाराजी व्यक्त केली.
शिवस्मारकाच्या कामाला तांत्रिक मान्यता मिळाली नसताना, हायपॉवर कमिटीने दिलेली मान्यता गृहीत धरुन काम सुरु करण्याचा घाट घातला गेला. स्मारक समितीचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी
कामाच्या निविदेबद्दल गंभीर आक्षेप मुख्यमंत्र्यांकडे नोंदविले आहेत. असे असताना स्वत: मेटे यांनी पायाभरणीचा खटाटोप का केला, असा सवाल केला जात आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकात पाटील यांच्या परस्पर कार्यक्रम उरकण्यामागे मेटे यांचा काय हेतू होता, असा सवाल एका मंत्र्यांने केला.
‘स्मारकारच्या जागेचे पंतप्रधानांच्या हस्ते जलपूजन केल्यानंतर तत्काळ काम सुरु व्हायला हवे होते, मात्र कोणाच्या हव्यासापोटी पायाभरणीचा उद्योग केला गेला,’ असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. तसेच ‘कालच्या कार्यक्रमाचे शिवसेनेला निमंत्रण नव्हते. सरकार तरी कुठे होते,’ असा खोचक प्रश्न शिवसेना खा. अरविंद सावंत यांनी विचारला. ‘सुरक्षेची काळजी न घेता पायाभरणीचा आग्रह धरणाऱ्यांवर खटले भरले पाहिजेत, असे शिवसेना खा. संजय राऊत यांनी म्हटले आहे.
>घटना दुर्दैवी - पाटील
मेटे यांनी पत्र देऊन काही आक्षेप घेतले आहेत, पण त्यात काहीही अर्थ नाही. कामाचे ई टेंडर काढले होते. त्यातील एक निविदा तांत्रिकदृष्टीने रद्द झाली. दोन निविदांचे दर जास्ती होते व तिसरी निकषात बसणारी होती, तरीही त्यांच्याशीही चर्चा करुन दर कमी केले आहेत. झालेली घटना दुर्दैवी होती.
- चंद्रकांत पाटील, बांधकाम मंत्री

Web Title: Dissatisfied with the work of Shiv Samrak, the government's Impersonation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.