क्रॉस मैदानाचा ताबा महापालिकेकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 03:40 AM2017-11-07T03:40:25+5:302017-11-07T03:40:36+5:30

चर्चगेटजवळील क्रॉस मैदान, देखभाल आणि संरक्षणासाठी मुंबई महापालिकेकडे हस्तांतरित करण्याबाबतचा आदेश राज्य शासनाने जारी केला आहे

The control of the cross-field of Municipal Corporation | क्रॉस मैदानाचा ताबा महापालिकेकडे

क्रॉस मैदानाचा ताबा महापालिकेकडे

Next

मुंबई : चर्चगेटजवळील क्रॉस मैदान, देखभाल आणि संरक्षणासाठी मुंबई महापालिकेकडे हस्तांतरित करण्याबाबतचा आदेश राज्य शासनाने जारी केला आहे, तसेच हे मैदान सर्कशीचे खेळ आणि विविध प्रकारच्या प्रदर्शनांसाठी उपलब्ध करून देण्यास महसूल विभागाने परवानगी दिली असून, सोमवारी याबाबतचा
शासन निर्णय (जीआर) जारी करण्यात आला.
चर्चगेटजवळील क्रॉस मैदान विविध प्रकारच्या प्रदर्शनांसाठी प्रसिद्ध होते. मात्र, राज्य सरकारने डागडुजी आणि निगराणीसाठी मैदान ओवल ट्रस्टकडे सोपविले. त्यानंतर, सर्कसबरोबर या मैदानात होणाºया प्रदर्शनांपासून विविध कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली. या विरोधात वेस्टर्न इंडिया सर्कस असोसिएशनने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने सर्कस असोसिएशनच्या बाजूने निकाल देत, होमगार्डची जागा वगळता क्रॉस मैदान सर्कस, तसेच प्रदर्शनांसाठी उपलब्ध करून देण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले. क्रॉस मैदानासंदर्भात १९८८च्या नियमावलीनुसार विविध कारणांसाठी मैदान उपलब्ध करून देण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करत, राज्य सरकारने आज ओव्हल ट्रस्टकडून मैदानाचा ताबा परत घेण्याचे आदेश जारी केले. आॅक्टोबर ते नोव्हेंबर या काळात प्राधान्याने सर्कससाठी हे मैदान उपलब्ध होणार आहे, तर जानेवारी महिन्यात विविध प्रदर्शनांसाठी देता येणार आहे.

Web Title: The control of the cross-field of Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.