दादरमध्ये आज काँग्रेसचा फेरीवाला सन्मान मार्च!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 06:51 AM2017-11-01T06:51:49+5:302017-11-01T06:52:22+5:30

मुंबई : एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर फेरीवाल्यांवर सुरू असलेली कारवाई आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून होणा-या मारहाणीविरोधात मुंबई काँग्रेसने बुधवारी फेरीवाला सन्मान मार्चची हाक दिली आहे.

Congress hawkers honor in Dadar today! | दादरमध्ये आज काँग्रेसचा फेरीवाला सन्मान मार्च!

दादरमध्ये आज काँग्रेसचा फेरीवाला सन्मान मार्च!

Next

मुंबई : एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर फेरीवाल्यांवर सुरू असलेली कारवाई आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून होणा-या मारहाणीविरोधात मुंबई काँग्रेसने बुधवारी फेरीवाला सन्मान मार्चची हाक दिली आहे. मनसेचा बालेकिल्ला असलेल्या दादरमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकत असल्याचे कारण देत पोलिसांनी फेरीवाला सन्मान मार्च काढण्यास परवानगी नाकारली आहे. मात्र कोणत्याही घोषणांविना दादरमधील काँग्रेस कार्यकर्ते व फेरीवाले सकाळी १० वाजता सन्मान मार्च काढणार असल्याची माहिती मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस नितीन पाटील यांनी दिली. आयडियल बूक डेपोपासून सुरू होणारा मार्च कबुतरखान्याजवळ संपेल.

Web Title: Congress hawkers honor in Dadar today!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई