भूतानमध्ये जाणाऱ्या भारतीयांसाठी विविध सवलती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2018 04:22 AM2018-05-09T04:22:02+5:302018-05-09T04:22:02+5:30

भारत व भूतानमधील अधिकृत राजनैतिक संबंधांना यंदा ५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर भूतानमध्ये जाणाºया भारतीयांसाठी विविध सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत.

concessions for Indians going to Bhutan | भूतानमध्ये जाणाऱ्या भारतीयांसाठी विविध सवलती

भूतानमध्ये जाणाऱ्या भारतीयांसाठी विविध सवलती

Next

मुंबई : भारत व भूतानमधील अधिकृत राजनैतिक संबंधांना यंदा ५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर भूतानमध्ये जाणाºया भारतीयांसाठी विविध सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. जून, जुलै, आॅगस्ट व डिसेंबरमध्ये भूतानमध्ये विविध ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
भूतानची सरकारी विमान कंपनी ड्रुक एअर व भूतान एअरलाईन्स ने जून, जुलै व आॅगस्टमध्ये भूतानमध्ये जाणाºया भारतीयांना हवाई प्रवासात ३० टक्के सवलत जाहीर केली आहे. त्याशिवाय भूतानमधील हॉटेल व रेस्टॉंरन्ट असोसिएशनने जुलै, आॅगस्ट व डिसेंबर मध्ये भारतीयांना हॉटेल वास्तव्यासाठी ५० टक्के सवलत जाहीर केली. या निमित्त भूतानमध्ये विविध महोत्सव व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात भूतानमधील संस्कृती, पारंपारिक खेळांची ओळख करून दिली जाईल.

Web Title: concessions for Indians going to Bhutan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.