‘मेट्रो-३’चे १२०० मीटर भुयार पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 07:15 AM2018-04-03T07:15:02+5:302018-04-03T07:15:02+5:30

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ भुयारी मार्गाचे काम वेगाने सुरू असून, आतापर्यंत या प्रकल्पांतर्गत बाराशे मीटर भुयार खणण्यात आल्याची माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने सोमवारी प्रसारमाध्यमांना दिली.

 Complete the 'Metro-3' 1200 meter gully | ‘मेट्रो-३’चे १२०० मीटर भुयार पूर्ण

‘मेट्रो-३’चे १२०० मीटर भुयार पूर्ण

googlenewsNext

मुंबई  -  कुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो-३ भुयारी मार्गाचे काम वेगाने सुरू असून, आतापर्यंत या प्रकल्पांतर्गत बाराशे मीटर भुयार खणण्यात आल्याची माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने सोमवारी प्रसारमाध्यमांना दिली.
मेट्रो-३ प्रकल्पांतर्गत भुयार खणण्याचे काम सर्वप्रथम माहीम येथील नयानगर येथून हाती घेण्यात आले. त्यानंतर, उर्वरित ठिकाणीही भुयार खणण्याचे काम हाती घेण्यात आले असून, विविध ठिकाणी आठ टनेल बोरिंग मशिन्सच्या मदतीने भुयार खणण्यात येत आहे. सद्यस्थितीमध्ये भुयार खणण्यासाठी अकरापैकी आठ मशिन्स भूगर्भात कार्यान्वित आहेत.
आझाद मैदान येथे भुयार खणण्यासाठीची दोन यंत्रे कार्यान्वित असून, त्यांना वैतरणा एक आणि दोन अशी नावे देण्यात आली आहेत. आझाद मैदानापासून ग्रँटरोडपर्यंत ४.५ किलोमीटरचे भुयार खणण्यात येणार आहे. माहिम नयानगर येथेही दोन यंत्रे कार्यान्वित असून, माहिमपासून दादरपर्यंत २.५ किलोमीटरचे भुयार खणण्यात येणार आहे. येथे कार्यरत असलेल्या यंत्रांस कृष्णा एक आणि दोन अशी नावे देण्यात आली आहेत.

विद्यानगरी येथेही दोन यंत्रे कार्यान्वित असून, त्या यंत्रांस गोदावरी एक आणि दोन अशी नावे देण्यात आली असून, विद्यानगरीपासून विमानतळापर्यंत २.९८ किलोमीटरचे भुयार खणण्यात येणार आहे. मरोळ येथे कार्यान्वित दोन्ही यंत्रांस वैनगंगा एक आणि दोन अशी नावे देण्यात आली असून, मरोळ ते विमानतळापर्यंत १.२ किलोमीटर भुयार खणण्यात येणार आहे.

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी या संदर्भात सांगितले की, मागील वर्षाच्या नोव्हेंबर महिन्यांत आम्ही पहिले यंत्र कार्यान्वित केले होते. सद्यस्थितीमध्ये बाराशे मीटरचे भुयार खणण्यात आले असून, हे यश म्हणजे आमच्यासाठी मैलाचा दगड असून, लवकरात लवरक १७ यंत्रे कार्यान्वित होतील. दरम्यान, मेट्रोसाठी भुयार खणत असलेल्या यंत्रांस नद्यांची नावे देण्यात आली आहेत.
 

Web Title:  Complete the 'Metro-3' 1200 meter gully

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.