आरोग्य सेविकांच्या मागण्यांवरून श्रेयाचा वाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 02:36 AM2018-08-07T02:36:09+5:302018-08-07T02:36:39+5:30

तुटपुंज्या मानधनावर महापालिकेच्या आरोग्य विभागासाठी काम करणाऱ्या आरोग्य सेविकांचे प्रश्न बराच काळापासून प्रलंबित आहेत.

Claim of credit from the demands of health careers | आरोग्य सेविकांच्या मागण्यांवरून श्रेयाचा वाद

आरोग्य सेविकांच्या मागण्यांवरून श्रेयाचा वाद

googlenewsNext

मुंबई : तुटपुंज्या मानधनावर महापालिकेच्या आरोग्य विभागासाठी काम करणाऱ्या आरोग्य सेविकांचे प्रश्न बराच काळापासून प्रलंबित आहेत. आरोग्य सेविकांच्या मागण्यांवरून पालिका सभागृहात जोरदार वाद रंगला. परंतु, हा विषय सर्वोच्च न्यायालयापुढे प्रलंबित असल्याने यावर बोलण्यास अतिरिक्त आयुक्त संजय मुखर्जी यांनी नकार देत या चर्चेतील हवाच काढली.
आरोग्य सेविकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी ३ आॅगस्टपासून आझाद मैदानात धरणे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाकडे प्रशासनाचे लक्ष वेधत शिवसेना, भाजपा व काँग्रेसने पालिका महासभेत चर्चेला सुरुवात केली. मात्र या चर्चेचे रूपांतर राजकीय वादात होऊन श्रेयाची लढाई उभय पक्षांमध्ये सुरू झाली. भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी आयुक्तांची भेट घेतल्यानंतर मंत्रालयातून मुख्यमंत्र्यांमार्फत आयुक्तांना आरोग्य सेविकांचे प्रश्न सोडविण्यासाठी आदेश दिले. विरोधी पक्ष नेता रवी राजा यांनी आरोग्य सेविकांना दिलेल्या आश्वासनांनुसार हा विषय सभागृहात निवेदनाद्वारे चर्चेला आणल्याचे बोलून दाखविले. तर शिवसेनेने सर्वप्रथम आरोग्य सेविकांच्या मागण्यांसाठी सभागृहात हरकतीचा मुद्दा उपस्थित केला. तसेच स्थायी समितीतही या विषयाला वाचा फोडण्याचे काम केल्याचे सांगितले. मात्र हा विषय सर्वोच्च न्यायालयात असल्याने यावर निर्णय देण्यास प्रशासनाने नकार दिला.
>आरोग्य सेविकांचा प्रश्न धसास लावणार
शिवसेनेने आरोग्य सेविकांच्या मागण्यांबाबत सातत्याने पाठपुरावा केला आहे, शिवसेना त्यांच्या मागण्यांबाबत गंभीर असल्याने हा प्रश्न धसास लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी सांगितले.
>याचिका मागे घ्या
आरोग्य सेविकांच्या काही मागण्यांबाबत उच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर पालिका प्रशासनाने सर्वोच्च न्यायालयात या निर्णयाला आव्हान दिले आहे. प्रशासन आरोग्य सेविकांच्या बाजूने संवेदनशील नाही, असा आरोप करीत सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी ही याचिका मागे घावी, अशी मागणी केली.
>भाजपाचा सेनेला टोला
भाजपा नेत्याने मंत्रालयात जाऊन प्रयत्न केले. चार हजार आरोग्य सेविका निर्णयाची वाट पाहत आहेत. सत्ताधाºयांनी प्रयत्न न केल्यानेच भाजपाने तो केला, असा टोला भाजपा गटनेता मनोज कोटक यांनी लगावला

Web Title: Claim of credit from the demands of health careers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.