दहिसर नदीवर बांधणार बंधारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 02:24 AM2018-09-21T02:24:41+5:302018-09-21T02:24:45+5:30

बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील मागाठाणे या भागात दहिसर नदीवर सुमारे पाच फुटांचा बंधारा बांधण्यात येणार आहे.

Bundra to be built on the Dahisar river | दहिसर नदीवर बांधणार बंधारा

दहिसर नदीवर बांधणार बंधारा

Next

मुंबई : बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील मागाठाणे या भागात दहिसर नदीवर सुमारे पाच फुटांचा बंधारा बांधण्यात येणार आहे. या बंधाऱ्याला दोन दरवाजे बसविण्यात येणार आहेत. इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्युमन व्हॅल्युज आणि आर्ट आॅफ लिव्हिंग फाउंडेशन यांच्या वतीने बंधारा बांधण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरात दहिसर नदीचा उगम होतो. सुमारे १३ किमी लांबीची दहिसर नदी आहे. उद्यानाच्या बोटिंग क्षेत्रापासून ७०० मीटरच्या अंतरावरील मागाठाणे येथे बंधारा बांधण्यात येणार आहे. यासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे जंगल संरक्षक प्रमुखाची परवानगी घेण्यात आली असून एमसीजीएमकडून एनओसी घेण्यात आली आहे. बंधाºयापासून पर्यावरणाला किंवा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला कोणताही धोका नसून, याउलट पर्यावरणाला फायदाच होणार असल्याचे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले आहे.
बंधारा दोन टप्प्यांत बांधला जाणार असून पहिल्या टप्प्यात बंधारा बांधण्यात येणार असून यासाठी २५ लाख रुपये खर्च येणार आहे. बंधारा बांधण्यासाठी सामान्यत: ६ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. दुसºया टप्प्यात नदीची स्वच्छता करण्यात येणार आहे.
बंधाºयामुळे भूजल पाण्याच्या पातळीत सुधारणा होणार असून बंधाºयापासून ७५० मीटर आतपर्यंत दहिसर नदीचे पाणी साठले जाईल. मुंबई शहर निसर्गाने हिरवे बनविण्यासाठी योग्य पाऊल असेल, असे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले आहे.
संस्थेने आतापर्यंत महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यातील चार राज्यांतील ४० नद्या वाचविल्या आहेत. या राज्यातील तब्बल ३ हजार गावांतील पाण्याचा प्रश्न सोडविला आहे.

Web Title: Bundra to be built on the Dahisar river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.