आयकर विभागाचा कामावर बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 03:23 AM2018-07-20T03:23:52+5:302018-07-20T03:24:37+5:30

१ आॅगस्टपासून अंमलबजावणीचा निर्णय

Boycott of Income Tax Department | आयकर विभागाचा कामावर बहिष्कार

आयकर विभागाचा कामावर बहिष्कार

Next

मुंबई : आयकर विभागात कमी मनुष्यबळ असताना आयकर जमा करण्याचे उद्द्ष्टि वाढवण्यात आलेले आहे. त्यामुळे कर्मचारी, अधिकाऱ्यांवर अतिरिक्त ताण पडत आहे. त्याचवेळी कर्मचारी व अधिकाºयांचा मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याने संतापलेल्या कर्मचारी व अधिकाºयांच्या फेडरेशनने कामावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. आयकर विभागातर्फे केल्या जाणाºया शोध मोहिम, धाडी, व जप्तीच्या मोहिमांमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी १ आॅगस्टपासून केली जाईल, असे फेडरेशनने स्पष्ट केले आहे. इन्कम टॅक्स गॅझेटेड आॅफिसर असोसिएशन व इन्कम टॅक्स एम्प्लॉईज फेडरेशनने हा इशारा दिला आहे. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी १२ सप्टेंबरला एक दिवसीय लाक्षणिक संप करण्यात येणार आहे.
मुंबई विभागात सुमारे १०० आयकर निरीक्षक आयकर अधिकारी होण्यास पात्र असताना त्यांची बढती प्रक्रिया रखडलेली आहे. त्यामुळे बढती प्रक्रियेवर त्याचा परिणाम झाला आहे. न्यायालयीन प्रक्रियेमध्ये ही प्रक्रिया रखडल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. मात्र, तात्पुरत्या स्वरूपात बढती देऊन ही समस्या सोडवता येईल. या मागणीची गांभीर्याने दखल घ्यावी व न्याय द्यावा अशी मागणी इन्कम टॅक्स एम्प्लॉईज फेडरेशनचे अध्यक्ष रविंद्र नायर यांनी मुख्य आयकर आयुक्त पी.सी.मोदी यांच्याकडे केली आहे.
आयकर खात्यातर्फे गतवर्षी देशात कर जमवण्याचे उद्दिष्ट १० लाख कोटी रूपये होते यंदा त्यामध्ये १ लाख कोटी रूपयांची वाढ केली आहे. देशाच्या एकूण उद्दिष्टापैकी तब्बल ४० टक्के हिस्सा मुंबईचा असतो. मात्र अधिकाºयांच्या रिक्त जागांमुळे कामावर परिणाम होण्याची भीती वर्तवण्यात आली आहे. खात्यांतर्गत बढत्या रखडल्याने त्याचा परिणाम सर्व बढत्यांवर होत आहे. सहाय्यक आयकर आयुक्त या पदासाठी पात्र असलेल्या अधिकाºयांना १ एप्रिल २०१७ पासून बढत्या देण्यात आलेल्या नाहीत. सध्या सुमारे ४० टक्के रिक्त आहेत. सहाय्यक आयकर आयुक्तांना तात्पुरत्या स्वरूपात बढती द्यावी जेणेकरून त्यांना पुढील बढत्या मिळण्यात अडचणी येणार नाहीत. आयकर अधिकारी व आयकर निरीक्षक यांच्या वेतनासंदर्भात केंद्रीय प्रशासकीय लवादाच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी, अधिकाºयांना पुरेशी कार्यालयीन जागा द्यावी, आयकर बिझनेस अ‍ॅप्लिकेशन सॉफ्टवेअरमध्ये सुधारणा करावी, रोजंदारी वर काम करणाºयांना वेळेवर वेतन द्यावे अशा विविध मागण्यांसाठी फेडरेशनने संपाचा इशारा दिला आहे. २३ जुलै पासून आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू होईल व २४ जुलै या आयकर दिवसाच्या कार्यक्रमात देखील सहभागी होणार नसल्याचे फेडरेशनने कळवले आहे.

Web Title: Boycott of Income Tax Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.