भाजपा सरकार बलात्कार करणाऱ्यांच्या पाठीशी! राज ठाकरे यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 05:35 AM2018-04-16T05:35:39+5:302018-04-16T05:35:39+5:30

देशभर संतापाची लाट उसळलेल्या ‘आसिफा’ प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी भारतीय जनता पार्टीवर गंभीर आरोप केले. मनसे महिलांच्या सक्षमीकरणासाठी उभे राहत असताना, सत्ताधारी भाजपा बलात्कार करणा-या आरोपींना पाठीशी घालत आहे.

BJP government behind the rape victims! Raj Thackeray's criticism | भाजपा सरकार बलात्कार करणाऱ्यांच्या पाठीशी! राज ठाकरे यांची टीका

भाजपा सरकार बलात्कार करणाऱ्यांच्या पाठीशी! राज ठाकरे यांची टीका

Next

मुंबई - देशभर संतापाची लाट उसळलेल्या ‘आसिफा’ प्रकरणावरून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी भारतीय जनता पार्टीवर गंभीर आरोप केले. मनसे महिलांच्या सक्षमीकरणासाठी उभे राहत असताना, सत्ताधारी भाजपा बलात्कार करणा-या आरोपींना पाठीशी घालत आहे. मुळात बलात्कार करणाºयाचा धर्म न पाहता, सौदी अरेबियाप्रमाणे आरोपीला तिथल्या तिथेच ठेचून मारायला पाहिजे, असा संतापही राज यांनी व्यक्त केला.
मुलुंड पश्चिमेत १०० महिलांना रिक्षा वाटप करण्यासाठी रविवारी आयोजित केलेल्या कार्यक्रमात राज ठाकरे बोलत होते. ते म्हणाले की, एका मंदिरात घडलेल्या आसिफा प्रकरणावेळी मंदिरातील देव कुठे गेले होते? बलात्कार पीडितेला हिंदू किंवा मुस्लीम म्हणून कसे पाहू शकता? सौदी अरेबियाप्रमाणे बलात्कार करणाºयांचे हात-पाय तोडले, तरच दहशत निर्माण होईल. गुन्हेगारांना तत्काळ शिक्षा झाली, तर देश वठणीवर येईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सगळी प्रकरणे अंगावर आल्यावर, देशभर आंदोलने होऊ लागल्यावर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आठवण झाली. पंतप्रधान पदाची शपथ घेतली, तेव्हा त्यांना बाबासाहेबांची आठवण झाली नाही. गेल्या चार वर्षांत सांगण्यासारखे काहीच केले नसल्याने, हिंदू-मुस्लीम दंगल भडकावण्यासाठी हे प्रयत्न सुरू आहेत. निवडणुकांमध्ये मुद्देच हवे असतील, तर बांगलादेशी व पाकिस्तानी मुस्लिमांना बाहेर काढा, असेही ते म्हणाले.

नाणार प्रकल्पाला ठाम विरोध!
कोकणातच काय राज्यात नाणार प्रकल्प होऊ देणार नसल्याचे राज यांनी ठणकावून सांगितले. राज म्हणाले की, महाराष्ट्रात प्रकल्प झाला नाही, तर नाणार प्रकल्प गुजरातमध्ये जाण्याची मुख्यमंत्री धमकी देतात. सगळ्या गोष्टी ठरल्या असल्याने मुख्यमंत्र्यांना इतर राज्य आठवत नाहीत. मात्र, प्रकल्प चंद्रावर गेला तरी चालेल, पण महाराष्ट्रात प्रकल्प होऊ देणार नसल्याचे राज यांनी स्पष्ट केले. ‘कुंपणच शेत खातंय’ अशा शब्दांत नाणारमधील शेत जमिनींच्या विक्रीवरही त्यांनी कडाडून टीका केली

१ मेपासून महाराष्ट्र दौरा! : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून १ मे पासून राज्याचा दौरा करणार असल्याचे राज ठाकरे यांनी जाहीर केले. या दौºयाची सुरुवात पालघरमध्ये १ मे रोजी जाहीर सभा घेऊन करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. त्या वेळी अनेक विषयांवर बोलणार असल्याचे राज यांनी स्पष्ट केले.

तुमच्यासाठी कायपण! : उस्मानाबादचे मराठी शेतकरी भाजीपाला घेऊन मुंबईत विकायला येतात. मात्र, परप्रांतीय भाजीवाल्यांसाठी शिवसेनेचा नगरसेवक त्यांची तक्रार करतो, असा आरोपही राज यांनी केला. मात्र, मराठी माणसांसाठी कोणताही त्रास सहन करायला तयार असून, वाईटपणा घेण्याची तयारी राज यांनी दर्शविली.

सत्ता आली तर... : सत्तेवर आल्यावर भाजपाने दरवर्षी २ कोटी रोजगार देण्याची घोषणा केली होती. मात्र, कोणतीही सत्ता नसताना मनसेने आज १०० महिलांना रोजगार दिला आहे. युती सरकारप्रमाणे मनसे थापा मारत नसून ‘जे बोलू ते निश्चित करू’ असेही राज म्हणाले.

Web Title: BJP government behind the rape victims! Raj Thackeray's criticism

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.