भाजपाकडून महाराष्ट्रातील ३ उमेदवारांची घोषणा; सोलापूरात नवा चेहरा, प्रणिती शिंदेंना चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2024 09:22 PM2024-03-24T21:22:17+5:302024-03-24T21:24:22+5:30

भाजपाने यापूर्वी महाराष्ट्रातील २० उमेदवारांच्या नावांची घोषणा केली होती.

BJP announces 3 candidates from Maharashtra loksabha; A new face from Solapur, ram satpute challenges Praniti Shinde | भाजपाकडून महाराष्ट्रातील ३ उमेदवारांची घोषणा; सोलापूरात नवा चेहरा, प्रणिती शिंदेंना चॅलेंज

भाजपाकडून महाराष्ट्रातील ३ उमेदवारांची घोषणा; सोलापूरात नवा चेहरा, प्रणिती शिंदेंना चॅलेंज

मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडून आज ५ वी आणि महाराष्ट्रातील उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. १११ उमेदवारांच्या यादीत भाजपााने कंगणा रणौतलाही उमेदवारी दिली असून नुकतेच भाजपात प्रवेश केलेल्या उद्योजक नवीन जिंदाल यांनाही हरयाणातून लोकसभेच्या रिंगणात उतरवले आहे. दुसरीकडे महाराष्ट्रातील ३ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये, सोलापुरातून आमदार राम सातपुते यांना उमेदवारी देत नवा चेहरा मैदानात उतरवण्यात आला आहे. खासदार जय सिद्धेश्वर यांचं तिकीट कापण्यात आलं आहे. 

भाजपाने यापूर्वी महाराष्ट्रातील २० उमेदवारांच्या नावांची घोषणा केली होती. त्यानंतर, आता तीन लोकसभा मतदारसंघातील उमेदवार घोषित केले आहेत. त्यामध्ये, सोलापुरातून आमदार राम सातपुते, भंडारा-गोंदियातून सुनिल बाबूराव मेंढे आणि गडचिरोलीतून अशोक महादेवराव नेते यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे, माजी केंद्रीय गृहमंत्र्यांचा मतदारसंघ असलेल्या सोलापुरात आमदार प्रणिती शिंदे विरुद्ध राम सातपुते अशी तरुण लढत पाहायला मिळणार आहे. 

काँग्रेसकडून आमदार प्रणिती शिंदे यांना या मतदारसंघातून तिकीट देण्यात आलं असून हा मतदारसंघ एससी प्रवर्गासाठी राखीव असल्याने येथे राम सातपुते यांना भाजपाने मैदानात उतरवले आहे. त्यामुळे, येथील लढत रंगतदार होणार आहे.

दरम्यान, ५ व्या यादीत भाजपाने कंगना रणौतला हिमाचल प्रदेशमधील मंडी येथून उमेदवारी दिली आहे. त्यामुळे, आता कॉन्ट्रावर्सी क्वीन कंगनाही भाजपासाठी मैदानात उतरल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकांसाठी अब की बार, ४०० पारचा नारा देणाऱ्या भाजपाने १११ उमेदवारांची ५ वी यादी जाहीर केली असून अनेक नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.  
 

Web Title: BJP announces 3 candidates from Maharashtra loksabha; A new face from Solapur, ram satpute challenges Praniti Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.