कर्नाळ्यातील पक्ष्यांनी घेतला मोकळा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2019 07:02 AM2019-11-05T07:02:43+5:302019-11-05T09:05:36+5:30

अभयारण्य झाले प्लास्टिकमुक्त : १७२ प्रजातींचे पक्षी आणि ६४२ प्रजातींचे वृक्ष

The birds of the Karnal took a deep breath | कर्नाळ्यातील पक्ष्यांनी घेतला मोकळा श्वास

कर्नाळ्यातील पक्ष्यांनी घेतला मोकळा श्वास

Next

सचिन लुंगसे 

मुंबई : १३४ प्रजातींचे स्थानिक पक्षी, ३८ प्रजातींचे स्थलांतरित पक्षी आणि ६४२ प्रजातींचे वृक्ष, वेली, वनौषधी आणि दुर्मिळ वनस्पतींनी नटलेले कर्नाळा पक्षी अभयारण्य सुमारे १२.११ चौरस किलोमीटरवर पसरले आहे. हे अभयारण्य प्लास्टिकमुक्त असल्याने येथील निसर्गसौंदर्य टिकून आहे.

भयारण्य निर्मितीत पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली यांचे मोठे योगदान आहे. रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुक्यात मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १७ वर पनवेलपासून १२ कि.मी.वर हे अभयारण्य आहे. कर्नाळा किल्ला समुद्रसपाटीपासून ४४५ मीटर उंचीवर असून, येथील वनसंपदा नष्ट होऊ नये म्हणून शासनाने पुढाकार घेतला आहे. 

पक्षी सप्ताह विशेष

लांब शेपटीचा स्वर्गीय नर्तक

शिकारी पक्षी :
तुरेवाला सर्पगरुड,
खरूची, कापशी, शिक्रा.
मोठे पक्षी : जंगली कोंबडा, भारद्वाज, धनेश.
येथील आकर्षण : शामा, लांब शेपटीचा स्वर्गीय नर्तक, तिबेटी खंड्या.
विविध पक्षी :
तांबट, कुरटुक, शिंजीर, रानकस्तुर, रक्ताभ सुतार, हरितांग, मिलिंद, सोनेरी पाठीचा सुतार, नवरंग, नीलिमा, नीलमणी, शैल कस्तुर, पर्वत कस्तुर, निलांग, खंड्या, पाचूकवडा.
सस्तन प्राणी : रानमांजर, ससा, भेकर, रानडुक्कर, सायाळ, खार, वानर हे सस्तन प्राणी व सरपटणारे प्राणीही येथे दर्शन देतात.
मोठे वृक्ष : आपटा, आवळा, उंबर, ऐन, करंज, कोकम, खैर, चिंच, जांभूळ, बेल, मोह.
औषधी वनस्पती : आवळा, कोकम, बेहडा, रिठा. झुडुपवर्गीय वनस्पती : अडुळसा, एरंड, करवंट, घाणोरी, निरगुडी.
वेली : गुळवेल,
पळसवेल, मोरवेल, गारंबी.

134 प्रजातींचे स्थानिक
पक्षी येथे आढळतात. नोव्हेंबर ते एप्रिल या कालावधीतील सुमारे ३८ प्रजातींचे स्थलांतरित पक्षी आढळतात.

कर्नाळा पक्षी अभयारण्याचा बहुतांश भाग दक्षिण दमट मिश्र पानझडी वनांचा आहे.

642 प्रजातींचे वृक्ष, वेली, वनौषधी आणि दुर्मिळ वनस्पतींचा समावेश आहे.

Web Title: The birds of the Karnal took a deep breath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.