लेप्टोपासून सावध राहा !, अतिवृष्टीनंतर मुंबईत प्रतिबंधात्मक आरोग्य सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2017 02:52 AM2017-09-02T02:52:52+5:302017-09-02T02:53:02+5:30

मंगळवारी झालेल्या अतिवृष्टी दरम्यान मदतकार्य करणा-या महापालिकेच्या सुमारे ३० हजार कर्मचाºयांसह विविध कार्यकर्ते, नागरिक यांना पावसाच्या पाण्यामधून चालावे लागले.

Beware of leptops! After the overwhelming majority of preventive health surveys in Mumbai | लेप्टोपासून सावध राहा !, अतिवृष्टीनंतर मुंबईत प्रतिबंधात्मक आरोग्य सर्वेक्षण

लेप्टोपासून सावध राहा !, अतिवृष्टीनंतर मुंबईत प्रतिबंधात्मक आरोग्य सर्वेक्षण

Next

मुंबई : मंगळवारी झालेल्या अतिवृष्टी दरम्यान मदतकार्य करणा-या महापालिकेच्या सुमारे ३० हजार कर्मचाºयांसह विविध कार्यकर्ते, नागरिक यांना पावसाच्या पाण्यामधून चालावे लागले. या वेळी साचलेल्या घाण पाण्यात वावरलेल्या व्यक्तींना लेप्टोस्पायरोसिस होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पालिकेच्या आरोग्य खात्याने प्रतिबंधात्मक आरोग्य सर्वेक्षणांतर्गत गृहभेटी सुरू केल्या आहेत. याद्वारे गुरुवारपर्यंत ३६ हजार २०२ व्यक्तींवर प्रतिबंधात्मक औषधोपचार करण्यात आले. तसेच, महापालिका क्षेत्रात आयोजित केलेल्या २८ आरोग्य शिबिरांत ३ हजार ६७८ नागरिकांनी सहभाग घेतला.
याबाबत अधिक माहिती देताना महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. पद्मजा केसकर यांनी सांगितले की, ज्या व्यक्ती पुराच्या पाण्यातून एकदाच चालल्या आहेत, त्या व्यक्ती ‘कमी जोखीम’ या गटात मोडतात. तर एकदाच पुराच्या पाण्यातून चाललेल्या पण अंगावर किंवा पायावर जखम असलेल्या किंवा चुकून पुराचे पाणी तोंडात गेलेल्या व्यक्ती या ‘मध्यम जोखीम’ या प्रकारात येतात. तसेच एकापेक्षा अधिक वेळा पुराच्या पाण्याशी संपर्क आल्यास अशा व्यक्ती ‘अतिजोखीम’ या गटात मोडतात. यामध्ये ८ वर्षांपेक्षा कमी वयाची मुले आणि गरोदर महिला यांच्या बाबतीत अधिक खबरदारी घेणे गरजेचे असते.

‘डॉक्सिसायलिन
२००’ घ्या, लेप्टोपासून
बचाव करा
लेप्टोचा धोका टाळण्यासाठी ‘डॉक्सिसायलिन २००’ ही गोळी कुणी व कशाप्रकारे घ्यावी याची माहिती इंडियन मेडिकल असोसियशनने दिली आहे. पाण्यात चालताना पायाला जखम झालेली नाही, मात्र पाण्यातून चालत आलेल्या व्यक्तींनी ही गोळी ७२ तासांच्या आत घ्यावी. जास्त काळ पाण्यात राहिलेल्या व्यक्तींनी ही गोळी ३ ते ५ दिवस तर दीर्घकाळ दूषित पाण्यात राहिलेल्या व्यक्तींनी आठवड्यातून एकदा या पद्धतीने सहा आठवडे ही गोळी घ्यावी, असे सांगण्यात आले आहे.

मनुष्यापासून मनुष्याला या
संसर्गाची बाधा होत नाही
शहरी विभागात लेप्टोस्पायरा हे सूक्ष्म जंतू उंदीर व कुत्रे यांच्यात आढळतात. संसर्गित जनावरांच्या मूत्राद्वारे दूषित झालेले पाणी, अन्न व माती यामार्फत मनुष्याला संसर्ग होतो. हा संसर्ग जखम झालेली त्वचा, डोळे, नाक याद्वारे होतो. पावसाळ्यात व पूर आल्यानंतर किंवा अतिवृष्टी झाल्यानंतर लोकांना दूषित पाण्यातून चालावे लागले तर शरीरावरील जखमांमधून या रोगाचे जंतू आपल्या शरीरात प्रवेश करू शकतात.

लक्षणे : ताप, तीव्र डोकेदुखी, थंडी वाजणे, स्नायुदुखी, उलटी, कावीळ, रक्तस्राव इत्यादी या रोगाची लक्षणे आहेत. रुग्णांना श्वासोच्छ्वास करण्यास त्रास होणे, मूत्रपिंड व यकृत निकामी होऊन त्यांना योग्य वेळी औषधोपचार न मिळाल्यास मृत्यू होण्याचा धोका संभवतो.

प्राण्यांच्या मूत्रापासून
होते बाधा
लेप्टोस्पायरोसिस हा रोग लेप्टोस्पायरा (स्पायराकिटस) या सूक्ष्म जंतूमुळे होतो. उंदीर, कुत्रे, घोडे, म्हशी, बैल तसेच इतर काही प्राणी या रोगाचे स्रोत आहेत. बाधित प्राण्यांच्या लघवीद्वारे संसर्गित झालेल्या पाण्याच्या संपर्कात येताच मनुष्याला ‘लेप्टोस्पायरोसिस’ या रोगाची लागण होऊ शकते.

नागरिकांनी घ्यावयाची काळजी
पावसाळ्यात कोणताही ताप डेंग्यू, मलेरिया अथवा लेप्टोस्पायरोसिस असू शकतो. त्यामुळे तापाकडे दुर्लक्ष न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
पायावर जखम असल्यास साचलेल्या पाण्यातून ये-जा करणे टाळावे किंवा गमबुटाचा वापर करावा.
साचलेल्या पाण्यातून चालून आल्यावर पाय
साबणाने स्वच्छ धुऊन कोरडे
करावे.
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लेप्टोस्पायरोसिस प्रतिबंधात्मक उपचार तातडीने घेणे आवश्यक आहे.
ताप आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
पुरेशी विश्रांती, पोषक आहार व वेळेत उपचार घ्यावा.
उंदीर, घुशींचा नायनाट करावा.
घरात व आजूबाजूला कचरा साठणार नाही याची दक्षता घ्यावी व कचºयाची विल्हेवाट लावावी.

Web Title: Beware of leptops! After the overwhelming majority of preventive health surveys in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.