Assistance to 7 lakh patients of '108', 36 thousand patients in Mumbai | ‘१०८’चे ७ लाख रुग्णांना साहाय्य, मुंबईतील ३६ हजार रुग्णांचा समावेश

- स्नेहा मोरे

मुंबई : आपत्कालीन परिस्थितीत वैद्यकीय मदत सुविधा मिळावी, यासाठी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका सेवा चार वर्षांपूर्वी सुरू केली. ही सेवा सुरू केल्यानंतर, आतापर्यंत २० लाख ६४ हजार ७७२ रुग्णांना या रुग्णवाहिकेची सेवा पुरवण्यात आली. तर गेल्या वर्षभरात राज्यभरात ७ लाख ८२ हजार ४९१ रुग्णांना या रुग्णवाहिकेने नवजीवन दिले, यात मुंबईतील ३६ हजार ७२ रुग्णांचा समावेश आहे. यामुळे ही सेवा रुग्णांसाठी वरदान ठरत असल्याचे दिसून आले आहे.
या तातडीच्या वैद्यकीय सेवा प्रकल्पात रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीची रुग्णसेवा देण्यात येते. या सेवेविषयी महाराष्ट्र इमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस (१०८) चे चिफ आॅपरेटिंग आॅफिसर डॉ. ज्ञानेश्वर शेळके यांनी सांगितले की, ९३७ रुग्णवाहिका कार्यरत असून ५ हजार तज्ज्ञांचा चमू रुग्णांच्या सेवेत असतो.

(जानेवारी २०१७ ते डिसेंबर २०१७)
आपत्कालीन सेवेचे प्रकार रुग्णसंख्या (राज्य) रुग्णसंख्या (मुंबई)
आकस्मिक अपघात ७३१२० १५४३
हल्ला १०९८३ ३१७
भाजणे ३८८६ १८१
हृदयरुग्ण २१०७ ३१६
पडणे २४६०६ ४0११
विषबाधा ३०७८६ २६९
प्रसूतीकळा/गर्भधारणा २२४०७० ४४७६
वीज पडणे/शॉक लागणे ११५८ ३२
दुर्घटना ३९०७ १३५
अन्य १३२१२० २६९७
पॉलीट्रामा १४२५ २१२
आत्महत्या/स्वत: केलेली इजा ७५९ ६0
एकूण ७८२४९१ ३६0७२


Web Title: Assistance to 7 lakh patients of '108', 36 thousand patients in Mumbai
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.