रॅगिंगविरोधी कायदा अधिक सक्षम करणार -गिरीश महाजन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2019 07:23 AM2019-06-09T07:23:13+5:302019-06-09T07:23:50+5:30

मुंबईच्या टोपीवाला राष्टÑीय वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेणाऱ्या डॉ. पायल तडवी या विद्यार्थिनीने मागील महिन्यात २२ तारखेला वरिष्ठांकडून होणाºया रॅगिंंगला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली होती

Anti-ragging law will be more competent - Girish Mahajan | रॅगिंगविरोधी कायदा अधिक सक्षम करणार -गिरीश महाजन

रॅगिंगविरोधी कायदा अधिक सक्षम करणार -गिरीश महाजन

Next

नाशिक : रॅगिंगविरोधी कायद्यात आवश्यक त्या तरतुदी करून हा कायदा अधिकाधिक सक्षम करण्यात येईल, असे आश्वासन राज्याचे जलसंपदा व वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिले.

मुंबईच्या टोपीवाला राष्टÑीय वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेणाऱ्या डॉ. पायल तडवी या विद्यार्थिनीने मागील महिन्यात २२ तारखेला वरिष्ठांकडून होणाºया रॅगिंंगला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेने अवघे राज्य संतापले आहे. या पार्श्वभूमीवर महाजन यांनी नाशिक दौºयावर असताना पोलीस आयुक्तालयात प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
या वेळी ते म्हणाले, एकीकडे आपला देश महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत असताना पुरोगामी महाराष्टÑात विद्यार्थिनींच्या बाबतीत रॅगिंगसारखे प्रकार घडणे दुर्दैवी आहे. उच्चशिक्षण घेणाºया विद्यार्थिनीला रॅगिंगला कंटाळून आपले जीवन संपवावे लागले ही निषेधार्ह बाब आहे. या प्रकरणी सखोल चौकशी सुरू असून, रॅगिंगविरोधी कायदा अधिकाधिक सक्षम करण्यासाठी निश्चित प्रयत्न केले जातील. रगिंंगविरोधी कायदा अस्तित्वात आहे; मात्र तो कायदा अधिक बळकट करण्याची गरज असल्याचे महाजन म्हणाले.
 

Web Title: Anti-ragging law will be more competent - Girish Mahajan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.