रद्द दौऱ्याचा पालिकेला साडेसात लाखांचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2018 03:19 AM2018-07-25T03:19:00+5:302018-07-25T03:19:23+5:30

ट्रॅव्हल कंपनीने पैसे परत करण्यास दिला नकार; अधिकारी गोत्यात

The anniversary of the canceled tour pays Rs | रद्द दौऱ्याचा पालिकेला साडेसात लाखांचा फटका

रद्द दौऱ्याचा पालिकेला साडेसात लाखांचा फटका

Next

मुंबई : करदात्या मुंबईकरांच्या पैशांची कशी उधळपट्टी सुरू आहे, याचे एक प्रकरण नुकतेच समोर आले आहे. दोन वर्षांपूर्वी महापालिकेच्या बाजार व उद्यान समितीने जम्मू-काश्मीर येथे काढलेला दौरा अचानक रद्द करण्यात आला. मात्र, भरलेली रक्कम परत करण्यास ट्रॅव्हल कंपनीने नकार दिल्यामुळे तब्बल साडेसात लाख रुपयांवर महापालिकेला पाणी सोडावे लागले आहे. आता मात्र हा दौरा रद्द करणाºया अध्यक्षांऐवजी त्याचे बुकिंग करणाºया अधिकाºयावरच कारवाई होणार आहे.
या दौºयाला समितीचे तत्कालीन अध्यक्ष अजित भंडारी, सदस्य आणि अधिकारी असे १७ जण जाणार होते. यात विमान प्रवास, वास्तव्य, नाश्ता, जेवण अशा खर्चांकरिता आयुक्तांच्या स्वेच्छा अधिकारातील खर्चातील निधीचा वापर करण्यात आला होता. यासाठी तत्कालीन अध्यक्ष भंडारी यांनी त्यांचे स्वीय सहायक प्रद्युम्न केणी यांच्याकडे ३० जानेवारी २०१६ रोजी १३ लाख रुपये जमा केले होते.
या दौºयासाठी २०१६ला ७ लाख ६२ हजार ३६७ रुपये देण्यात आले. २ फेब्रुवारीला हा दौरा रद्द करण्यात आला. याबाबतची सूचना केणी यांनी राजशिष्टाचार व संपर्क अधिकाºयांना दिली. परंतु दौरा ज्या दिवशी सुरू होणार तेव्हाच रद्द झाल्यामुळे पैसे परत देण्यास कंपनीने नकार दिला. त्यामुळे आयुक्तांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे केलेल्या चौकशीत दौºयाचे आरक्षण करणाºया केणी यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) यांनी दिले आहेत. त्यानुसार या दौºयाच्या नुकसानाबाबत प्राथमिक चौकशी करण्यात येणार आहे.

> जम्मू आणि काश्मीरमधील बाजार व उद्यानांच्या विकासाचा अभ्यास करण्यासाठी महापालिकेच्या बाजार व उद्यान समितीच्या सर्व सदस्यांचा दौरा दोन वर्षांपूर्वी आयोजित करण्यात आला होता. २ ते ६ फेब्रुवारी २०१६ या कालावधीत श्रीनगर येथे हा ‘अभ्यास दौरा’ पार पडणार होता. या दौºयासाठी २०१६ला ७ लाख ६२ हजार ३६७ रुपये देण्यात आले. २ फेब्रुवारीला हा दौरा रद्द करण्यात आला. दौरा ज्या दिवशी सुरू होणार तेव्हाच रद्द झाल्यामुळे पैसे परत देण्यास कंपनीने नकार दिला.

Web Title: The anniversary of the canceled tour pays Rs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.