विमानातील सहप्रवासी अभिनेत्रीच्या अंगचटीला; दिली मधली सीट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2023 12:25 PM2023-10-12T12:25:47+5:302023-10-12T12:26:32+5:30

मुंबई : मुंबईतून विमानाने कोचीला जाण्यासाठी निघालेल्या मल्याळी सिनेमातील एका आघाडीच्या अभिनेत्रीला सहप्रवाशाने त्रास दिल्याची घटना घडली आहे. त्या ...

A co-passenger on the plane to the actress; Gave middle seat | विमानातील सहप्रवासी अभिनेत्रीच्या अंगचटीला; दिली मधली सीट

विमानातील सहप्रवासी अभिनेत्रीच्या अंगचटीला; दिली मधली सीट

मुंबई : मुंबईतून विमानाने कोचीला जाण्यासाठी निघालेल्या मल्याळी सिनेमातील एका आघाडीच्या अभिनेत्रीला सहप्रवाशाने त्रास दिल्याची घटना घडली आहे. त्या व्यक्तीने तिच्याशी वाद घातला तसेच तिच्या अंगाला हात लावण्याच प्रयत्नही केल्याची घटना तिने विमानातील केबिन कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. मात्र, तिची जागा बदलून तिला दुसरी सीट देण्यापलीकडे विमान कर्मचाऱ्यांनी या घटनेची फारशी दखल घेतली नसल्याचा दावा तिने केला आहे. 

दिली मधली सीट
- एअर इंडियाच्या विमानाने मंगळवारी रात्री ही अभिनेत्री मुंबईतून कोचीला जाण्यासाठी निघाली होती. तिला मधली सीट मिळाली होती. 
- मात्र, तिच्या बाजूला बसलेल्या एका प्रवाशाशी वाद झाला. त्यानंतर त्या प्रवाशाने तिच्या अंगाला हात लावण्याचा प्रयत्न केला. तिने तातडीने विमानातील केबिन कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली. 
- मात्र, त्यानंतर त्यांचा वाद मिटवण्याचा प्रयत्न करत विमान कर्मचाऱ्यांनी तिला पुढील रांगेतील मधली सीट बदलून दिली. कोचीला उतरल्यानंतर तिने तक्रार केली. 
 

Web Title: A co-passenger on the plane to the actress; Gave middle seat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.