वीज निर्मितीमध्ये ७.८५ टक्के वाढ; उन्हाळ्यातही अधिक वीज उत्पादनाकरिता कोळसा मिळणार

By सचिन लुंगसे | Published: April 3, 2024 07:42 PM2024-04-03T19:42:39+5:302024-04-03T19:42:51+5:30

महानिर्मितीने वर्षभरात ८ हजार मेगावॅटपेक्षा अधिकच्या नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प कामांचे नियोजन केले.

7.85 percent increase in power generation Coal will be available for more power generation even in summer | वीज निर्मितीमध्ये ७.८५ टक्के वाढ; उन्हाळ्यातही अधिक वीज उत्पादनाकरिता कोळसा मिळणार

वीज निर्मितीमध्ये ७.८५ टक्के वाढ; उन्हाळ्यातही अधिक वीज उत्पादनाकरिता कोळसा मिळणार

मुंबई: ग्राहकांना स्वस्त दरात वीज देण्यासाठी उत्पादनाकरिता प्रयत्न केल्याने २०२३-२४ या आर्थिक वर्षात महानिर्मितीचे वीज उत्पादन ६१,४३९ दशलक्ष युनिट्स झाले आहे. २०२२-२०२३ मध्ये ५७,७३४ दशलक्ष युनिट्स अशी ५.९८ टक्के वाढ आणि २०२३-२०२४ मध्ये ६१,४३९ दशलक्ष युनिट्स आणि ७.८५ टक्के वाढ झाल्याचा दावा महानिर्मितीने केला आहे. शिवाय सद्यस्थितीत महानिर्मितीच्या औष्णिक वीजनिर्मिती केंद्रांमध्ये २२ लाख मेट्रिक टन कोळसा साठा उपलब्ध असून मागील वर्षांच्या तुलनेत ३ लाख मेट्रिक टन जास्त कोळसा साठा आहे. त्यामुळे आगामी उन्हाळ्याच्या दृष्टिकोनातून अधिक वीज उत्पादनाकरिता पुरेसा कोळसा साठा उपलब्ध आहे, असेही महानिर्मितीकडून सांगण्यात आले.

महानिर्मितीने वर्षभरात ८ हजार मेगावॅटपेक्षा अधिकच्या नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प कामांचे नियोजन केले. त्यात सौर ऊर्जा, तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प, पवन ऊर्जा, उदंचन जल विद्युत केंद्र, हरित हायड्रोजन प्रकल्पाचा समावेश आहे. महानिर्मितीने २३ संचांसाठी एफ.जी.डी. यंत्रणा लावण्याचे निश्चित केले आहे तसेच भुसावळ येथे सौर ऊर्जेच्या  सहाय्याने २० घनमीटर प्रति तास क्षमतेचा हरित हायड्रोजन प्रकल्प उभारत आहे.  याचबरोबर चंद्रपूर येथे ५० दशलक्ष घनमीटर क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प कार्यान्वित केला आहे.  तसेच कोल पाईप कन्व्हेयरद्वारे खाणीतून थेट कोळसा वीज केंद्रात आणण्याची प्रणाली कार्यान्वित झाली असून कोराडी-खापरखेडा येथे कोल पाईप कन्व्हेयर प्रणाली टप्पा १ सुरू झाला आहे.

विजेची निर्मिती (दशलक्ष युनिट्स)
भुसावळ ७,५७५.२३५
चंद्रपूर १६,२७९.६६९
पारस ३,५९५.९८३
कोराडी १३,२००.३०१
खापरखेडा ८,२६७.४०९
नाशिक २,६४७.३७६  
परळी ४,१०४.२१६
उरण १,७६९.०३२
जल विद्युत प्रकल्प ३,६६७.८३३
सौर ऊर्जा प्रकल्प ३३२.१०५

वीज केंद्रांची कामगिरी
- २५० मेगावॅट पारस संच ४ मधून सलग २५८ दिवसांपेक्षा जास्त वीज उत्पादन
- ५०० मेगावॅट चंद्रपूर संच क्रमांक ८ मधून २३४ दिवस अखंडित उत्पादन
- महानिर्मितीच्या सात संचांमधून १०० दिवसांपेक्षा जास्त दिवस अखंडित वीज उत्पादन
- महानिर्मितीचे सर्वोच्च औष्णिक वीज उत्पादन ८,४६० मेगावॅट
- २९ जानेवारी रोजी सकाळी ९.४५ वाजता १०,४०३ मेगावॅट इतके विक्रमी वीज उत्पादन

Web Title: 7.85 percent increase in power generation Coal will be available for more power generation even in summer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.