५९ युनिट रक्त संकलन; ३३ जणांचे अवयवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 02:15 AM2017-08-18T02:15:31+5:302017-08-18T02:15:36+5:30

रक्तदान आणि अवयवदानाचे महत्त्व लक्षात घेता, दिशा फाउंडेशनच्या वतीने नुकतेच रक्तदान आणि अवयवदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

59 Unit Blood Collection; Contribution of 33 people | ५९ युनिट रक्त संकलन; ३३ जणांचे अवयवदान

५९ युनिट रक्त संकलन; ३३ जणांचे अवयवदान

Next

मुंबई : रक्तदान आणि अवयवदानाचे महत्त्व लक्षात घेता, दिशा फाउंडेशनच्या वतीने नुकतेच रक्तदान आणि अवयवदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. घाटकोपर पूर्वेकडील पंतनगर येथील महापालिका शाळा क्रमांक ३ येथे आयोजित उपक्रमादरम्यान ५९ युनिट रक्त संकलित झाले; तर ३३ जणांनी अवयवदान केले, अशी माहिती दिशा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शैलेश शेट्टी यांनी दिली. ‘लोकमत’ या उपक्रमाचे माध्यम प्रायोजक होते.
घाटकोपर विभागाचे साहाय्यक पोलीस आयुक्त भीमदेव राठोड, पंतनगर पोलीस ठाण्याचे
वरिष्ठ पोलीस अधिकारी फडके,
अ‍ॅड. सुजाता जाधव, पुणे येथील क्रांतिवीर महिला संघटनेच्या सोहनी डांगे, मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री अमिषा आंबेकर, निवेदिका अर्पिता तिवारी, राजावाडी रक्तपेढीच्या जनसंपर्क अधिकारी अश्विनी लोहार, डॉ. काशिनाथ जाधव, जे.जे. महानगर रक्तपेढीच्या नीता डांगे, राज्य सरकारचे विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्राच्या प्रतिनिधी सुजाता आष्टेकर, नॅशनल प्रिव्हेन्शन कंट्रोल आॅफ ब्लाइंडनेसचे प्रतिनिधी डॉ. पी. के. देशमुख आदी या वेळी उपस्थित होते. उपक्रमाला हातभार लावणाºया चिमुरड्यांसह रक्त आणि अवयवदात्यांना सन्मानचिन्हासह प्रशस्तिपत्रक आणि रोपटे देऊन गौरविण्यात आले.
मागील सात वर्षांत या उपक्रमाद्वारे ६४७ युनिट रक्त संकलित करण्यात आले असून, मागील वर्षी
१२ जणांनी अवयवदान केले
होते. दरम्यान, दिशा फाउंडेशनच्या उपक्रमाला जे. जे. रक्तपेढी,
राजावाडी रक्तपेढी, रोटोसोटो
सेंटर, राज्य सरकारचे विभागीय प्रत्यारोपण समन्वय केंद्र, चेंबूर
येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयाचे विद्यार्थी, आय बँक असोसिएशन आॅफ इंडिया यांनी सहकार्य केले.

Web Title: 59 Unit Blood Collection; Contribution of 33 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.