'ZP शाळांच्या दुरुस्तीसाठी 400 कोटी, खासगी क्लासेसवरही लवकरच निर्बंध'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 07:20 PM2019-06-28T19:20:58+5:302019-06-28T19:22:00+5:30

मुंबई - राज्यातील जिल्हा परिषद शाळांची दुरुस्ती, शौचालय बांधणी व भौतिक सुविधांसाठी 400 कोटीचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, ...

400 crores for ZP school repair, temporary restriction on private class, by ashish shelar | 'ZP शाळांच्या दुरुस्तीसाठी 400 कोटी, खासगी क्लासेसवरही लवकरच निर्बंध'

'ZP शाळांच्या दुरुस्तीसाठी 400 कोटी, खासगी क्लासेसवरही लवकरच निर्बंध'

Next

मुंबई - राज्यातील जिल्हा परिषद शाळांची दुरुस्ती, शौचालय बांधणी व भौतिक सुविधांसाठी 400 कोटीचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल, अशी महत्त्वाची घोषणा आज विधानसभेत शालेय शिक्षण क्रिडा व युवक कल्याण मंत्री अॅड आशिष शेलार यांनी केली. शिक्षण विभागाच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना शिक्षण मंत्री अॅड. शेलार यांनी या विभागाचे विविध कार्यक्रम विषद केले.

जिल्हा परिषदेच्या शाळांमधे समाजातील शेवटच्या घटकातील  मुले शिक्षण घेतात. त्यामुळे त्यांना भौतिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी 400 कोटी रुपयांचा निधी सादिल अनुदानाच्या माध्यमातून देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. तसेच तसेच ग्राम विकास विभागातर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या 125 व्या जयंती निमित्ताने जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मुलींसाठी शौचालय उभारणीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. तसेच खाजगी ट्युशन क्लासेसवर निर्बंध आणणारा कायदा तयार करण्यासाठी गठीत केलेल्या कमिटीने कायद्याचा मसूदा तयार केला असून महिनाभरात तो हरकती व सूचनांसाठी घोषित करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
 

Web Title: 400 crores for ZP school repair, temporary restriction on private class, by ashish shelar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.