विजयदुर्गमध्ये १८०७ एकर जमीन ईडीने केली जप्त

By मनोज गडनीस | Published: April 9, 2024 07:03 PM2024-04-09T19:03:55+5:302024-04-09T19:04:27+5:30

पंजाब अँड महाराष्ट्र बँक कर्ज घोटाळा प्रकरणी कारवाई, वाधवान यांची मालमत्ता जप्त

1807 acres of land in Vijaydurg seized by ED | विजयदुर्गमध्ये १८०७ एकर जमीन ईडीने केली जप्त

विजयदुर्गमध्ये १८०७ एकर जमीन ईडीने केली जप्त

मुंबई - पंजाब अँड नॅशनल बँकेकडून हजारो कोटींचे कर्ज घेत ते बुडवल्याप्रकरणी ईडीने (सक्तवसुली संचालनालय) कोकणातील देवगढ तालुक्यातील विजयदुर्ग या गावातील तब्बल १८०७ एकर जमीन जप्त केली आहे. याची किंमत ५२ कोटी ९० लाख रुपये इतकी आहे. 

प्राप्त माहितीनुसार, एचडीआयएल कंपनीचे प्रवर्तक राकेश कुमाव वाधवान, सारंग वाधवान तसेच त्यांच्याशी संबंधित लोकांनी पंजाब अँड महाराष्ट्र बँकेकडून घेतलेल्या कर्जाच्या रकमेतून २०१० ते २०१३ या कालावधीमध्ये वाधवान यांनी कोकणात एकूण ४१३ भूखंडांची खरेदी करत ही १८०७ एकर जमीन विकत घेतल्याचा ठपका ईडीने ठेवला आहे. या करिता एकूण ८२ कोटी ३० लाख रुपये मोजण्यात आले. मात्र, ज्या ३९ शेतकऱ्यांची जमिन खरेदी करण्यात आली त्यांना बरीचशी रक्कम रोखीने देण्यात आली व व्यवहाराची कागदोपत्री किंमत ५२ कोटी ९० लाख रुपये दाखवण्यात आली. बँकेकडून घेतलेल्या कर्जाच्या रकमेचा अपहार करत त्यातून ही जमीन खरेदी केल्यामुळे या जमिनीची जप्ती करण्यात आली आहे.

Web Title: 1807 acres of land in Vijaydurg seized by ED

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई