lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > टाटा समूह जेट एअरवेजची संपत्ती घेण्यास उत्सुक

टाटा समूह जेट एअरवेजची संपत्ती घेण्यास उत्सुक

गेल्या वर्षी जेट एअरवेज संकटात आल्यानंतर कंपनीचे संस्थापक अध्यक्ष नरेश गोयल यांनी जेट एअरवेज विकण्याचा प्रस्ताव एतिहाद एअर व टाटा समूहाला दिला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2019 02:20 AM2019-07-02T02:20:44+5:302019-07-02T02:20:50+5:30

गेल्या वर्षी जेट एअरवेज संकटात आल्यानंतर कंपनीचे संस्थापक अध्यक्ष नरेश गोयल यांनी जेट एअरवेज विकण्याचा प्रस्ताव एतिहाद एअर व टाटा समूहाला दिला होता.

 Tata group is keen to acquire Jet Airways wealth | टाटा समूह जेट एअरवेजची संपत्ती घेण्यास उत्सुक

टाटा समूह जेट एअरवेजची संपत्ती घेण्यास उत्सुक

मुंबई : आर्थिक संकटात सापडलेल्या जेट एअरवेजला नादार घोषित करा, अशी मागणी जेटच्या ऋणकोंनी नॅशनल कंपनी लॉ ट्रायब्युनलकडे (एनसीएलटी) केली आहे. जेट नादार झाली तर तिची संपत्ती घेण्यासाठी आता टाटा समूह सरसावला आहे अशी माहिती जेटमधील सूत्रांनी दिली.
गेल्या वर्षी जेट एअरवेज संकटात आल्यानंतर कंपनीचे संस्थापक अध्यक्ष नरेश गोयल यांनी जेट एअरवेज विकण्याचा प्रस्ताव एतिहाद एअर व टाटा समूहाला दिला होता. एतिहाद ही गोयल यांची भागीदार कंपनी होती व ती मध्य पूर्वेतील एक प्रमुख व सधन विमान कंपनी आहे. टाटा समूहाने सिंगापूर एअरलाइन्सच्या भागीदारीत एअर एशिया इंडिया कंपनी स्थापन केली आहे. विस्तारा एअरवेज ही विमानसेवा तिच्यामार्फत चालते. परंतु प्रदीर्घ चर्चेनंतर दोन्ही कंपन्यांनी जेट विकत घेण्यास स्वारस्य नसल्याचे कळवले. जेट एअरवेजजवळ एकेकाळी १२४ विमानांचा ताफा होता तो आता १४ विमानांवर आला आहे. ही सर्व विमाने ‘वाइड-बॉडीड’ म्हणजे चार इंजिने असलेली मोठी विमाने आहेत. याशिवाय पूर्वी जेटच्या ७५० विमानफेऱ्या होत्या. त्यापैकी ५०० विमानफेºया जेटने इतर कंपन्यांना तात्पुरत्या दिल्या आहेत. त्यामुळे जेटकडे दर आठवड्याला ७० हजार आंतरराष्ट्रीय प्रवाशांची असलेली वाहतूक क्षमता अन्य कंपन्यांना आपोआपच मिळाली आहे.

विस्ताराची होईल वाढ
एनसीएलटीने जेटला नादार घोषित केले तर ही सर्व संपत्ती विक्रीसाठी उपलब्ध होईल आणि तिचा फायदा विस्तारा एअरवेजच्या व्यवसाय वाढीसाठी करता येईल. त्यामुळे टाटा समूह ही संपत्ती घेण्यासाठी उत्सुक असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title:  Tata group is keen to acquire Jet Airways wealth

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.