lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > इंटरपोलची चोक्सीविरुद्ध ‘रेड कॉर्नर’ नोटीस

इंटरपोलची चोक्सीविरुद्ध ‘रेड कॉर्नर’ नोटीस

पंजाब नॅशनल बँकेत केलेल्या घोटाळ्याप्रकरणी इंटरपोलने उद्योगपती मेहुल चोक्सीविरोधात ‘रेड कॉर्नर’ नोटीस बजावली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2018 05:22 AM2018-12-14T05:22:16+5:302018-12-14T05:22:47+5:30

पंजाब नॅशनल बँकेत केलेल्या घोटाळ्याप्रकरणी इंटरपोलने उद्योगपती मेहुल चोक्सीविरोधात ‘रेड कॉर्नर’ नोटीस बजावली आहे.

'Red Corner' notice against Interpol Choxy | इंटरपोलची चोक्सीविरुद्ध ‘रेड कॉर्नर’ नोटीस

इंटरपोलची चोक्सीविरुद्ध ‘रेड कॉर्नर’ नोटीस

मुंबई : पंजाब नॅशनल बँकेत केलेल्या घोटाळ्याप्रकरणी इंटरपोलने उद्योगपती मेहुल चोक्सीविरोधात ‘रेड कॉर्नर’ नोटीस बजावली आहे. मेहुल चोक्सी हा नीरव मोदीचा मामा असून तो अँटिग्वामध्ये असल्याचे समोर आले आहे. त्याला तेथून हुडकून काढण्याचे इंटरपोलसमोर आव्हान आहे.

नीरव मोदी व मेहुल चोक्सी यांनी ‘लेटर आॅफ अंडरटेकिंग’द्वारे (एलओयू) पंजाब नॅशनल बँकेतून १४ हजार कोटी रुपयांचे कर्ज मिळवले. ते न फेडता जानेवारीमध्ये दोघांनीही कुटुंबासह भारतातून पळ काढला. फेब्रुवारीमध्ये घोटाळा उघडकीस आल्यावर सीबीआय व ईडी या दोघांनी तपास सुरू केला. आता सीबीआयच्या विनंतीवरुन इंटरपोलने चोक्सीविरोधात नोटीस बजावली आहे.

Web Title: 'Red Corner' notice against Interpol Choxy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.