lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > व्यवसायात सकारात्मक दृष्टिकोन महत्त्वाचा - संजीव पेंढरकर

व्यवसायात सकारात्मक दृष्टिकोन महत्त्वाचा - संजीव पेंढरकर

व्यवसाय करताना सकारात्मक दृष्टिकोन अतिशय महत्त्वाचा असून, त्यामुळे अपयशांवर सजह मात करता येते, असे प्रतिपादन विको लेबॉरेटरीजचे संचालक संजीव पेंढरकर यांनी केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2018 02:58 AM2018-10-24T02:58:40+5:302018-10-24T02:58:46+5:30

व्यवसाय करताना सकारात्मक दृष्टिकोन अतिशय महत्त्वाचा असून, त्यामुळे अपयशांवर सजह मात करता येते, असे प्रतिपादन विको लेबॉरेटरीजचे संचालक संजीव पेंढरकर यांनी केले.

Positive Attitude in Business Important - Sanjeev Pendharkar | व्यवसायात सकारात्मक दृष्टिकोन महत्त्वाचा - संजीव पेंढरकर

व्यवसायात सकारात्मक दृष्टिकोन महत्त्वाचा - संजीव पेंढरकर

नागपूर : व्यवसाय करताना सकारात्मक दृष्टिकोन अतिशय महत्त्वाचा असून, त्यामुळे अपयशांवर सजह मात करता येते, असे प्रतिपादन विको लेबॉरेटरीजचे संचालक संजीव पेंढरकर यांनी केले.
ग्लोबल महाराष्ट्रीयन एन्टरप्रिनरशिप कॉनक्लेव्ह-२०१८ हा अतिशय मानाचा मराठी उद्योजकांचा सोहळा मुंबईत अलीकडेच पार पडला. त्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. नवउद्योजकांसमोर निराशेचे प्रसंग उद्भवतात, तेव्हा त्याला कसे सामोरे जायचे, यावर पेंढरकर यांनी मार्गदर्शन केले. व्हिजन कसे ठरवावे, या अनुषंगाने सादरीकरण कसे करावे, याबद्दलही त्यांनी माहिती दिली. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, मनसेचे प्रमुखे राज ठाकरे, साई संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे, ज्येष्ठ पत्रकार रोहिणी खाडिलकर आदी उपस्थित होते. (वा.प्र.)

Web Title: Positive Attitude in Business Important - Sanjeev Pendharkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.