lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > जगातील सर्वांत मोठा स्मार्ट फोन प्रकल्प भारतात; रोज ३ लाख हँडसेट निर्मिती, ७० हजार लोकांना रोजगार

जगातील सर्वांत मोठा स्मार्ट फोन प्रकल्प भारतात; रोज ३ लाख हँडसेट निर्मिती, ७० हजार लोकांना रोजगार

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जाय-इन यांनी सोमवारी उत्तर प्रदेशातील नोएडा येथील ‘सॅमसंग’च्या विस्तारित मोबाइल उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 05:16 AM2018-07-10T05:16:27+5:302018-07-10T05:16:53+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जाय-इन यांनी सोमवारी उत्तर प्रदेशातील नोएडा येथील ‘सॅमसंग’च्या विस्तारित मोबाइल उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन केले.

World's largest smart phone project in India; employing 70 thousand people | जगातील सर्वांत मोठा स्मार्ट फोन प्रकल्प भारतात; रोज ३ लाख हँडसेट निर्मिती, ७० हजार लोकांना रोजगार

जगातील सर्वांत मोठा स्मार्ट फोन प्रकल्प भारतात; रोज ३ लाख हँडसेट निर्मिती, ७० हजार लोकांना रोजगार

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जाय-इन यांनी सोमवारी उत्तर प्रदेशातील नोएडा येथील ‘सॅमसंग’च्या विस्तारित मोबाइल उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन केले. हा जगातील सर्वाधिक मोबाइल हँडसेटचे उत्पादन करणारा प्रकल्प ठरणार आहे.
दक्षिण कोरियाची महाकंपनी असलेल्या सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सकडून सध्या भारतात दरमहा ६७ लाख स्मार्ट फोन बनविले जातात. नव्या प्रकल्पामुळे आता कंपनी दरमहा १ कोटी २० लाख स्मार्ट फोनचे उत्पादन करेल.
या प्रकल्पात ७० हजार लोकांना रोजगार मिळेल. सध्या असलेल्या प्रकल्पाचा विस्तार करण्यासाठी कंपनी ४,९१५ कोटी रुपये गुंतवत आहे.

एवढ्या स्मार्ट फोनचे करणार काय?
नोएडातील प्रकल्पाचा विस्तार करण्यासाठी सॅमसंगने


4995
कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. येथे उत्पादित होणाऱ्या फोनची युरोप, आशिया आणि आफ्रिकेत निर्यातही होणार आहे.

भारतात
का?
भारत ही जगातील दुसºया क्रमांकाचा मोठा मोबाइल हँडसेटची बाजारपेठ आहे. जगात विकल्या जाणाºया एकूण
स्मार्ट फोनपैकी

10%
स्मार्ट फोन भारतात विकले जातात. म्हणून भारतात हा प्रकल्प होत आहे़

5०
हजार कोटी
२०१६-१७ सॅमसंगचा महसूल

34
हजार कोटी
मोबाइल फोन विक्रीत मिळाले

उत्पादन
होईल दुप्पट
हा विस्तारित प्रकल्प सध्याच्या प्रकल्पाला लागून आणखी



35
एकरात पसरला आहे. येथील मोबाइल फोन आणि रेफ्रिजरेटरचे उत्पादन आता दुप्पट होईल. या प्रकल्पात केवळ जुळणी होणार आहे. उत्पादनांचे सुटे भाग अन्य संस्थांकडून येथे पोहोचविले जातील.

 

Web Title: World's largest smart phone project in India; employing 70 thousand people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.