lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > अमेरिकेतील व्याज दरवाढीचे जगभरात पडसाद; भारतीय बाजारही आपटला, सेन्सेक्स ६९0 अंकांनी आला खाली

अमेरिकेतील व्याज दरवाढीचे जगभरात पडसाद; भारतीय बाजारही आपटला, सेन्सेक्स ६९0 अंकांनी आला खाली

अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हने व्याजदरात पाव टक्का वाढ करत व्याजदर २.२५ ते २.५० टक्के केला. त्याचा जगभरच्या शेअर बाजारांवर आज परिणाम होऊन भारतातील शेअर बाजार कोसळण्यात झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2018 05:27 AM2018-12-22T05:27:31+5:302018-12-22T05:28:18+5:30

अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हने व्याजदरात पाव टक्का वाढ करत व्याजदर २.२५ ते २.५० टक्के केला. त्याचा जगभरच्या शेअर बाजारांवर आज परिणाम होऊन भारतातील शेअर बाजार कोसळण्यात झाला.

 US hikes interest rates worldwide; In the Indian market, the Sensex dropped by 690 points | अमेरिकेतील व्याज दरवाढीचे जगभरात पडसाद; भारतीय बाजारही आपटला, सेन्सेक्स ६९0 अंकांनी आला खाली

अमेरिकेतील व्याज दरवाढीचे जगभरात पडसाद; भारतीय बाजारही आपटला, सेन्सेक्स ६९0 अंकांनी आला खाली

मुंबई : अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हने व्याजदरात पाव टक्का वाढ करत व्याजदर २.२५ ते २.५० टक्के केला. त्याचा जगभरच्या शेअर बाजारांवर आज परिणाम होऊन भारतातील शेअर बाजार कोसळण्यात झाला.
मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक (सेन्सेक्स) तब्बल ६८९.६० अंकानी घसरून ३६४३१.६७ वरून ३५७४२.०७ अंकांवर आला. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टी निर्देशांक १९७.७० अंकांनी घसरून १०९५१.७० अंकांवरून १०७५४ अंकांवर बंद झाला.
अमेरिकन व्याज दरात वाढ झाल्याबरोबरच काल न्यूयॉर्क स्टॉक एक्स्चेंजचा डो जोन्स निर्देशांक २ टक्क्यांनी घसरला तर नॅसडॅक निर्देशांक १.६७ टक्क्यांनी कमी झाला. ही पडझड आज जपानच्या निक्के ई, दक्षिण कोरियाच्या कोस्पी, चीनच्या शांघाय कॉम्पोझिट, हाँगकाँगच्या हँगसेंग या निर्देशांकातही बघायला मिळाली.
गेल्या आठवड्यात रिझर्व्ह बँकेने परदेशी व्यापार कर्जाची (ईसीबी) मर्यादा सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या ६.५० टक्के केली होती. त्याचाही परिणाम बाजारावर आज दिसला. यावर्षी (२०१८-१९ साठी) ईसीबीची मर्यादा केवळ १६० अब्ज डॉलर्स येते. त्यापैकी १२६ अब्ज डॉलर्स कर्ज उभारले गेले आहे. त्यामुळे पुढील तीन महिन्यात फक्त ३४ अब्ज डॉलर्स कर्ज उभारता येईल. ही मर्यादा कमी पडेल या भीतीनेही बाजारात अस्थिरता दिसून आली. परिणामी डॉलरच्या तुलनेत रुपया २७ पैशाने घसरून ६९.९६ वरून ७०.२३ वर बंद झाला.

तेलाच्या किमती कमी असूनही..!

कच्च्या तेलाच्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत गेल्या दोन महिन्यात ‘ओपेक’चे महत्त्व कमी होऊन सध्या सौदी अरेबिया, रशिया व अमेरिका हे तीन देश आता कच्च्या तेलाच्या किमती ठरवत आहेत. जगात रोज १०० ते ११० दशलक्ष बॅरल्स कच्चे तेल खपते. त्यापैकी ३० ते ३३ दशलक्ष बॅरल्स तेल हे तीन देश पुरवतात. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती कमी होत आहेत. आजही कच्चे तेल २ डॉलरने कमी होऊन ५६ वरून ५४ डॉलर्स प्रती बॅरलवर आले. पण ही सकारात्मक घटनाही शेअर बाजाराला सावरू शकली नाही.

Web Title:  US hikes interest rates worldwide; In the Indian market, the Sensex dropped by 690 points

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.