टाटा समूह (Tata Group) हा देशातील सर्वात मोठ्या औद्योगिक समूहांपैकी एक आहे. तसेच, देशातील सर्वात जुन्या औद्योगिक समूहांमध्ये त्याचा समावेश होतो. परंतु जगातील टॉप ५० इनोव्हेटिव्ह कंपन्यांमध्ये समाविष्ट असलेली ही एकमेव भारतीय कंपनी आहे. BCG ग्लोबल इनोव्हेशन सर्व्हे २०२३ मधील टॉप ५० इनोव्हेटिव्ह कंपन्यांच्या यादीत अमेरिकेचं वर्चस्व आहे.
त्यात २५ अमेरिकन कंपन्यांना स्थान मिळालं आहे. या यादीत पाच चिनी कंपन्यांचा समावेश आहे. तर पहिल्या पाचमधील सर्व कंपन्या अमेरिकेतील आहेत. जर आपण टॉप १० बद्दल बोललो तर यामध्ये अमेरिकेतील सहा, चीनमधील दोन, दक्षिण कोरियातील एक आणि जर्मनीतील एक कंपनीचा समावेश आहे. कोणत्याही भारतीय कंपनीला टॉप १० मध्ये स्थान मिळालेले नाही.
टाटा समूह २० व्या क्रमांकावर
या यादीत टाटा समूह २० व्या क्रमांकावर आहे. या यादीत पहिल्या सहा स्थानांवर अमेरिकन कंपन्यांचा समावेश आहे. आयफोन तयार करणारी अमेरिकेतील आघाडीची टेक कंपनी ॲपल पहिल्या स्थानावर, इलॉन मस्क यांची ईव्ही निर्माता कंपनी टेस्ला दुसऱ्या स्थानावर, ॲमेझॉन तिसऱ्या स्थानावर, गुगलची मूळ कंपनी अल्फाबेट चौथ्या स्थानावर, मायक्रोसॉफ्ट पाचव्या स्थानावर आणि मॉडर्ना ही कंपनी सहाव्या स्थानी आहे. या यादीत दक्षिण कोरियाची दिग्गज टेक कंपनी सॅमसंग सातव्या स्थानावर आहे.
Most innovative companies in 2023:
— World of Statistics (@stats_feed) March 17, 2024
1. 🇺🇸 Apple
2. 🇺🇸 Tesla
3. 🇺🇸 Amazon
4. 🇺🇸 Alphabet
5. 🇺🇸 Microsoft
6. 🇺🇸 Moderna
7. 🇰🇷 Samsung
8. 🇨🇳 Huawei
9. 🇨🇳 BYD
10. 🇩🇪 Siemens
11. 🇺🇸 Pfizer
12. 🇺🇸 Johnson & Johnson
13. 🇺🇸 SpaceX
14. 🇺🇸 Nvidia
15. 🇺🇸 ExxonMobil
16. 🇺🇸 Meta
17. 🇺🇸 Nike…
चीनची दूरसंचार उपकरण कंपनी हुवावे आठव्या स्थानावर, ईव्ही मेकर BYD नवव्या स्थानावर आहे आणि जर्मनीची सिमेन्स दहाव्या स्थानावर आहे. यानंतर ११ व्या ते १९व्या क्रमांकापर्यंत सर्व अमेरिकन कंपन्या आहेत. यामध्ये फायझर, जॉन्सन अँड जॉन्सन, स्पेस एक्स, एविडीया, झेन मोबाईल, नाइकी, मेटा, आयबीएम आणि ३ एम यांचा समावेश आहे. तर टाटा समूह यात २० व्या क्रमाकांवर आहे.
टाटांचा व्यवसाय
टाटा समूह विविध प्रकारच्या व्यवसायांमध्ये कार्यरत आहे आणि दोन डझनहून अधिक लिस्डेट कंपन्या आहेत. मार्केट कॅपच्या बाबतीत टाटा समूह हा देशातील सर्वात मोठा समूह आहे. मिठापासून लक्झरी कारपर्यंत सर्व काही बनवणारा हा समूह १८६८ मध्ये सुरू झाला. आज अनेक क्षेत्रात त्याचा दबदबा आहे.
टीसीएस ही देशातील सर्वात मोठी आयटी कंपनी आहे, तर स्टीलमध्ये टाटा स्टील, ऑटो क्षेत्रात टाटा मोटर्स आणि हॉटेल क्षेत्रात इंडियन हॉटेल कंपनीचं वर्चस्व आहे. एअर इंडिया पुन्हा ताफ्यात सामील झाल्यानंतर टाटा समूह विमान वाहतूक क्षेत्रातील एक मोठी शक्ती म्हणून उदयास आला आहे. टाटांच्या ताकदीचा अंदाज यावरून लावता येतो की, त्यांचं मार्केट कॅप पाकिस्तानच्या एकूण जीडीपीपेक्षा अधिक आहे.