lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > शेअर समालोचन - बाजारावर उमटली नकारात्मकतेची छाप

शेअर समालोचन - बाजारावर उमटली नकारात्मकतेची छाप

जगभरातील शेअर बाजारांमध्ये असलेली मंदीची परिस्थिती, कोरियामुळे असलेली जागतिक अशांतता, डॉलरची घसरू लागलेली किंमत, भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याचा हवामान विभागाचा अहवाल आणि जीएसटी कौन्सिलची बैठक यामुळे मुंबई शेअर बाजारावर गतसप्ताहामध्ये नकारात्मकतेचीच छाप पडलेली दिसून आली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 01:20 AM2017-09-11T01:20:13+5:302017-09-11T01:20:43+5:30

जगभरातील शेअर बाजारांमध्ये असलेली मंदीची परिस्थिती, कोरियामुळे असलेली जागतिक अशांतता, डॉलरची घसरू लागलेली किंमत, भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याचा हवामान विभागाचा अहवाल आणि जीएसटी कौन्सिलची बैठक यामुळे मुंबई शेअर बाजारावर गतसप्ताहामध्ये नकारात्मकतेचीच छाप पडलेली दिसून आली.

Share Commentary - Signs of negativity emerging on the market | शेअर समालोचन - बाजारावर उमटली नकारात्मकतेची छाप

शेअर समालोचन - बाजारावर उमटली नकारात्मकतेची छाप

- प्रसाद गो. जोशी
जगभरातील शेअर बाजारांमध्ये असलेली मंदीची परिस्थिती, कोरियामुळे असलेली जागतिक अशांतता, डॉलरची घसरू लागलेली किंमत, भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याचा हवामान विभागाचा अहवाल आणि जीएसटी कौन्सिलची बैठक यामुळे मुंबई शेअर बाजारावर गतसप्ताहामध्ये नकारात्मकतेचीच छाप पडलेली दिसून आली. बाजारावर मंदीचे ढग दाटून आल्याने साप्ताहिक घसरणही नोंदविली गेली आहे.
मुंबई शेअर बाजारात गतसप्ताह मंदीचाच राहिला. काही अपवाद वगळता सप्ताहात निर्देशांक खालीच आला. सप्ताहाच्या अखेरीस मुंबई शेअर बाजाराचा संवेदनशील निर्देशांक ३१६८७.५२ अंशांवर बंद झाला. मागील बंद निर्देशांकाच्या तुलनेत त्यामध्ये २०४.११ अंश म्हणजे ०.६४ टक्के एवढी घट झाली.
राष्टÑीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) सुद्धा गतसप्ताहात खाली आला. सप्ताहाच्या अखेरीस तो ९९३४.८० अंशांवर बंद झाला. मागील बंद निर्देशांकाच्या तुलनेत त्यामध्ये ३९.६ अंश म्हणजेच ०.४० टक्क्यांची घट झाली आहे.
उत्तर कोरियाकडून सुरू असलेल्या क्षेपणास्त्रांच्या चाचण्या आणि या देशाकडे अणुबॉम्ब असल्याची व्यक्त होत असलेली भीती यामुळे जागतिक अशांतता आहे. याचा परिणाम साहजिकच जगभरातील शेअर बाजारांवर होत आहे. त्यातच सप्ताहाच्या अखेरीस अमेरिकेत धडकलेले इरमा हे चक्रीवादळ आणि अमेरिकेतील व्याजदरामध्ये लवकर घट न होण्याची वर्तविली गेलेली शक्यता यामुळे डॉलरमध्ये घसरण सुरू झाली. यामुळे अन्य चलनांची स्थिती मजबूत होत असली तरी जगभरातील शेअर बाजारांमध्ये मात्र
धास्तीचे वातावरण आहे. त्यातच भारतीय हवामान विभागाने १ सप्टेंबरपर्यंत देशात सरासरीपेक्षा पाच टक्के कमी पाऊस झाल्याचे जाहीर केल्यानेही बाजार खाली येण्याला वेग आला.
आगामी सप्ताहात जाहीर होणाºया औद्योगिक उत्पादन आणि चलनवाढीविषयीच्या आकडेवारीवर बाजाराची वाटचाल ठरू शकते.

रुपयाचे मूल्य मासिक उच्चांकावर

युरोपियन सेंट्रल बँकेच्या बैठकीनंतर युरोच्या मूल्यात वाढ झाली असून डॉलर घसरला आहे. यामुळे शुक्रवारी डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य वधारले आणि त्याने महिन्यातील उच्चांकी धडक दिली.
शुक्रवारी एका डॉलरला रुपयाचे मूल्य ६३.१८ एवढे झाले असून तो महिन्यातील उच्चांक आहे. वर्षभराचा हिशोब करता रुपयाच्या मूल्यामध्ये झालेल्या वध-घटीमुळे ६.४४ टक्के एवढा परतावा मिळाला आहे.
युरोपियन सेंट्रल बँकेच्या बैठकीमध्ये युरो मजबूत करण्यासाठी पावले उचलण्याचा निर्णय झाला आणि त्यानंतर युरोच्या दरामध्ये वाढ झालेली दिसून आली. त्यापाठोपाठ अमेरिकन अधिकाºयांच्या व्याजदरवाढीबाबतच्या नकारात्मक टिप्पणीनंतर डॉलर घसरण्यास प्रारंभ झाला.
यामुळे भारतीय रिझर्व्ह बॅँकेने लगेचच आपल्याकडील डॉलरच्या साठ्याचा आढावा घेतला. १ सप्टेंबर रोजी परकीय चलन गंगाजळीत डॉलर उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे.

 

Web Title: Share Commentary - Signs of negativity emerging on the market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.