lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > संवेदनशील निर्देशांकामध्ये १० महिन्यांतील मोठी घसरण

संवेदनशील निर्देशांकामध्ये १० महिन्यांतील मोठी घसरण

भारतीय अर्थव्यवस्था आपला अपेक्षित वृद्धिदर गाठू न शकण्याची भीती, परकीय वित्तसंस्थांकडून होत असलेली सातत्यपूर्ण विक्री, अमेरिकेने कायम राखलेले व्याजदर, चीनचा कमी करण्यात आलेला पतदर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 02:35 AM2017-09-25T02:35:39+5:302017-09-25T02:35:51+5:30

भारतीय अर्थव्यवस्था आपला अपेक्षित वृद्धिदर गाठू न शकण्याची भीती, परकीय वित्तसंस्थांकडून होत असलेली सातत्यपूर्ण विक्री, अमेरिकेने कायम राखलेले व्याजदर, चीनचा कमी करण्यात आलेला पतदर्जा

Sensex falls 10-month high | संवेदनशील निर्देशांकामध्ये १० महिन्यांतील मोठी घसरण

संवेदनशील निर्देशांकामध्ये १० महिन्यांतील मोठी घसरण

शेअर समालोचन - प्रसाद गो. जोशी
भारतीय अर्थव्यवस्था आपला अपेक्षित वृद्धिदर गाठू न शकण्याची भीती, परकीय वित्तसंस्थांकडून होत असलेली सातत्यपूर्ण विक्री, अमेरिकेने कायम राखलेले व्याजदर, चीनचा कमी करण्यात आलेला पतदर्जा, या जोडीलाच उत्तर कोरियामुळे निर्माण झालेली राजकीय अस्थिरता, यामुळे मुंबई शेअर बाजाराच्या संवेदनशील निर्देशांकाने १० महिन्यांतील मोठी आपटी खाल्ली. या जोडीलाच निफ्टीही १० हजारांच्या खाली आला.
मुंबई शेअर बाजार गतसप्ताहात संथ होता. मात्र, सप्ताहाच्या अखेरच्या दिवशी उत्तर कोरियाने अमेरिकेला हायड्रोजन बॉम्बची चाचणी घेण्याच्या दिलेल्या धमकीने राजकीय वातावरण ढवळून निघाले आणि बाजार कोसळला. या दिवशी बाजाराने १० महिन्यांतील सर्वाधिक घसरण अनुभवली. सप्ताहाच्या अखेरीस हा निर्देशांक ३५०.१७ अंश म्हणजेच १.०८ टक्क्यांनी घसरून ३१९२२.४४ अंशांवर बंद झाला.
राष्टÑीय शेअर बाजाराचा निर्देशांक (निफ्टी) सप्ताहाच्या अखेरीस खाली आल्याने, दहा हजार अंशांची पातळी राखू शकला नाही. मागील सप्ताहापेक्षा १२१ अंश म्हणजेच १.१९ टक्के घसरून, तो ९९६४.४० अंशांवर बंद झाला.
भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ अपेक्षित दराने होण्यात येत असलेल्या अडचणी, चलनवाढीचा वाढत असलेला दर, यामुळे सरकारने काही सवलती दिल्या असल्या, तरी गुंतवणूकदार मात्र संभ्रमात पडले आहेत. यामुळेच आॅगस्ट महिन्यापासून सातत्याने विक्री करीत असलेल्या परकीय वित्तसंस्थांनी या सप्ताहातही भारतीय बाजारातून १२४२ कोटी रुपये काढून घेतले, तर देशी परस्पर निधींनी ५२० कोटी रुपयांची गुंतवणूक केली.
अमेरिकेने कायम राखलेले व्याजदर, तसेच जपाननेही अर्थव्यवस्था सुदृढ करण्यासाठी कायम ठेवलेले व्याजदर आणि एस अँड पी या पतमापन संस्थेने चीनचा घटविलेला पतदर्जा, यामुळे जगभरातील शेअर बाजारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले. याचा परिणाम भारतासह सर्वच उगवत्या भांडवल बाजारांवर झाला.

Web Title: Sensex falls 10-month high

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.