lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > सेन्सेक्स 5 आठवडय़ांच्या उंचीवर

सेन्सेक्स 5 आठवडय़ांच्या उंचीवर

जागतिक बाजारातील तेजी आणि व्याजदरांच्या बाबतीत संवेदनशील असलेल्या शेअर्समध्ये झालेली जोरदार खरेदी यामुळे बुधवारी शेअर बाजारात सलग दुस:या दिवशी तेजी दिसून आली.

By admin | Published: October 30, 2014 01:38 AM2014-10-30T01:38:30+5:302014-10-30T01:38:30+5:30

जागतिक बाजारातील तेजी आणि व्याजदरांच्या बाबतीत संवेदनशील असलेल्या शेअर्समध्ये झालेली जोरदार खरेदी यामुळे बुधवारी शेअर बाजारात सलग दुस:या दिवशी तेजी दिसून आली.

Sensex at 5-week high | सेन्सेक्स 5 आठवडय़ांच्या उंचीवर

सेन्सेक्स 5 आठवडय़ांच्या उंचीवर

मुंबई : जागतिक बाजारातील तेजी आणि व्याजदरांच्या बाबतीत संवेदनशील असलेल्या शेअर्समध्ये झालेली जोरदार खरेदी यामुळे बुधवारी शेअर बाजारात सलग दुस:या दिवशी तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 217 अंकांनी उसळून 27,098.17 अंकांवर बंद झाला. 
30 कंपन्यांचा समावेश असलेला सेन्सेक्स एका क्षणी 27,107.93 अंकांर्पयत वर चढला होता. सलग दुस:या दिवशी तेजीची चव चाखणारा सेन्सेक्स 22 सप्टेंबरनंतर पहिल्यांदा 27 हजार अंकांचा टप्पा ओलांडून पुढे गेला आहे. काल सेन्सेक्स 127.92 अंकांनी मजबूत झाला होता. 
नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा सीएनएक्स निफ्टी 62.85 अंकांनी वाढून 8,090.45 अंकांर्पयत बंद झाला. निफ्टी दिवसभर 8,097.95 ते 8,052.25 अंकांदरम्यान वर खाली होत होता. 
ब्रोकरांनी सांगितले की, गुरुवारी बाजारात मोठे चढ-उतार होतील. फेडरल अमेरिकेच्या फेडरल रिझव्र्हच्या निर्णयाचे पडसाद बाजारात
उमटतील. 
त्याचप्रमाणो डेरिव्हेटिव्ह सौद्यांच्या निपटा:याचा परिणामही दिसून येईल. फेडरल रिझव्र्हकडून बाँड खरेदी कार्यक्रम समाप्त करण्याची घोषणा केली जाऊ शकते. तथापि, व्याजदरांत वाढ करण्याआधी काही काळ वाट पाहण्याचे धोरण फेडरल रिझव्र्हकडून अवलंबिले जाऊ शकते. 
व्यावसायिक वाहन बनविणा:या कंपन्यांच्या शेअर्समध्ये चांगली मागणी पाहायला मिळाली. टाटा मोटर्स तसेच महिंद्रा अँड महिंद्रा या कंपन्यांना त्याचा लाभ मिळाला. 
बीएसई सेन्सेक्समध्ये समाविष्ट असलेल्या 30 पैकी 21 कंपन्यांचे शेअर्स मजबूत झाले. तेजीचा लाभ मिळालेल्या कंपन्यांत हिंदाल्को, टाटा स्टील, टाटा मोटर्स, इन्फोसिस, सेसा स्टरलाईट, बजाज ऑटो, रिलायन्स इंडस्ट्रीज, महिंद्रा, मारुती, सिप्ला, आयटीसी आणि टीसीएस या प्रमुख कंपन्यांचा समावेश आहे. डॉ. रेड्डीज लॅब, सन फार्मा, एनटीपीसी, भारती एअरटेल आणि एसबीआय या कंपन्यांचे शेअर्स मात्र कोसळले. 
सेन्सेक्समधील 30 पैकी 21 कंपन्यांना तेजीचा लाभ मिळाला. 9 कंपन्यांचे शेअर्स मात्र
कोसळले. 
शेअर बाजाराची एकूण रुंदी मजबूत राहिली. 1,610 कंपन्यांचे शेअर्स वर चढले. 1,355 कंपन्यांचे शेअर्स कोसळले. 109 कंपन्यांचे शेअर्स स्थिर राहिले. बाजारातील एकूण उलाढाल 2,869.03 कोटी झाली. काल ती 2,763.91 कोटी होती. (प्रतिनिधी)
 
4आशियाई बाजारात तेजीचा कल दिसून आला. चीन, हाँगकाँग, जपान, दक्षिण कोरिया, तैवान आणि सिंगापूर अशा सर्वच ठिकाणच्या शेअर बाजारांत 0.81 टक्के ते 1.84 टक्के वाढ नोंदली गेली. युरोपातील बाजार सकाळच्या सत्रत तेजी दर्शवीत होते. फ्रान्स, जर्मनी आणि ब्रिटन येथील बाजार 1.74 टक्के ते 2.12 टक्के वर चढले. 

 

Web Title: Sensex at 5-week high

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.