lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > किरकोळ महागाई दोन वर्षांच्या उच्चांकावर

किरकोळ महागाई दोन वर्षांच्या उच्चांकावर

किरकोळ महागाई जूनमध्ये जवळपास दोन वर्षांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. तेल आणि भोजनाच्या वस्तूंमध्ये वृद्धीमुळे महागाई वाढत चालली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 04:28 AM2018-07-11T04:28:20+5:302018-07-11T04:28:39+5:30

किरकोळ महागाई जूनमध्ये जवळपास दोन वर्षांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. तेल आणि भोजनाच्या वस्तूंमध्ये वृद्धीमुळे महागाई वाढत चालली आहे.

Retail inflation is at two-year high | किरकोळ महागाई दोन वर्षांच्या उच्चांकावर

किरकोळ महागाई दोन वर्षांच्या उच्चांकावर

बंगळुरू  - किरकोळ महागाई जूनमध्ये जवळपास दोन वर्षांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. तेल आणि भोजनाच्या वस्तूंमध्ये वृद्धीमुळे महागाई वाढत चालली आहे. त्यामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेकडून अतिरिक्त आर्थिक मदतीची अपेक्षा व्यक्त होत आहे. मात्र, पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका होणार असल्याने केंद्र सरकार अनेक लोकप्रिय घोषणा करण्याची शक्यता असून, त्यामुळे तिजोरीवरील
बोजा वाढेल आणि त्याचा महागाईवरही परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही.
अर्थतज्ज्ञांच्या मते जूनमध्ये किरकोळ महागाई ५.३० टक्के वाढली आहे. जुलै २०१६ पासूनची ही सर्वाधिक महागाई आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड तेलाच्या किमती १२ महिन्यांमध्ये २० टक्क्यांनी वाढल्या आहेत. जूनमध्ये या दरात १३ टक्के वाढ झाली आहे. महागाईसाठीचे हे एक प्रमुख कारण आहे.
भारतात क्रूड तेलाची आयात मोठ्या प्रमाणावर होते. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्यांच्या किमती वाढत चालल्याने सध्या सरकारच्या या अनिवार्य खर्चात वाढ होत आहे. त्यामुळे सरकारला विविध किमतीत १५ हजार कोटी रुपये एवढी वाढ करावी लागेल. कारण येत्या काही महिन्यांत महागाई दर वाढण्याची शक्यता आहे. अर्थतज्ज्ञ तन्वी गुप्ता जैन यांच्या मते, २०१९ मधील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोकप्रिय योजनांवरील खर्चात वाढ होऊ शकते. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासारख्या अनेक योजनांवर हा खर्च होऊ
शकतो. ठोक मूल्य निर्देशांकात १५ महिन्यांची सर्वाधिक ४.९३ टक्के एवढी घसरण जूनमध्ये होेईल, असा अंदाज होता. (वृत्तसंस्था)

दरवाढीचा धोका

जैन यांनी अशी भविष्यवाणी केली की, फायनान्शिअल कव्हरेज कमिटी (एमपीसी) आॅगस्टमध्ये २५ घटकांच्या बाबतीत शुल्कवाढ करू शकते. तरीही आर्थिक स्थिरता निश्चित करण्यासाठी १०० घटकांच्या दरवाढीचा धोका आहे. रॉयटर्सच्या अंदाजानुसार, १२ महिन्यांपूर्वी औद्योगिक उत्पादन ५.२ टक्क्यांनी तीन महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचले आहे. वार्षिक आधारभूत उत्पादनात ३.६ टक्के वाढ झाली आहे.

Web Title: Retail inflation is at two-year high

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.