lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > विजेची सबसिडी आता थेट आपल्या बँक खात्यात, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

विजेची सबसिडी आता थेट आपल्या बँक खात्यात, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

केंद्र सरकारनं विजेसंदर्भात नवं धोरण तयार केलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2019 03:12 PM2019-07-09T15:12:47+5:302019-07-09T15:14:25+5:30

केंद्र सरकारनं विजेसंदर्भात नवं धोरण तयार केलं आहे.

power tariff policy now electricity subsidy will come directly into bank account of consumer | विजेची सबसिडी आता थेट आपल्या बँक खात्यात, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

विजेची सबसिडी आता थेट आपल्या बँक खात्यात, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्लीः केंद्र सरकारनं विजेसंदर्भात नवं धोरण तयार केलं आहे. या धोरणातल्या नव्या नियमानुसार विजेची सबसिडी आता थेट तुमच्या खात्यात येणार आहे. तसेच ज्या कंपन्या वारंवार वीजपुरवठा खंडित करतात, त्यांनाही केंद्र सरकार दंड ठोठावणार आहे. केंद्र सरकारच्या शक्ती मंत्रालयानं हे धोरण तयार केलं आहे. या नव्या धोरणाची ऑगस्ट महिन्यापासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या नव्या धोरणामुळे वीजचोरी रोखण्यास मदत मिळणार आहे.

तसेच ग्राहकाला वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्याचा सामना करावा लागणार नाही. तसेच वीजपुरवठा करणाऱ्या कंपन्या ग्राहकांकडून वीजपुरवठ्याअतिरिक्त शुल्क आकारू शकणार नाहीत. ट्रान्समिशन आणि डिस्ट्रीब्यूशनदरम्यान  वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रक्रियेलाही ग्राहकांच्या खात्याशी जोडण्यात आलं आहे. त्यामुळे कंपन्यांना आता केवळ पुरवठा केलेल्या विजेचेच पैसे वसूल करता येणार आहे. 

सर्व घरात लावण्यात येणार स्मार्ट मीटर
कधी कधी घराच्या बाहेर असताना अचानक लक्षात येते की, आपण घरातील लाईट, टीव्ही किंवा अन्य दुसरे विजेचे उपकरण बंद करायला विसरलो. सध्याच्या परिस्थितीत अशी वेळ आल्यास आपण काहीच करू शकत नाही. परंतु, येणाऱ्या काळात हे चित्र पालटणार आहे. आपल्याला बाहेर राहूनही अ‍ॅपच्या माध्यमातून घरातील वीज बंद करता येणार आहे. हे स्मार्ट मीटरमुळे शक्य होणार आहे. स्मार्ट मीटरच्या माध्यमातून वीज चोरीवर लक्ष ठेवले जाईल. या मीटरमुळे कंपनीचा मीटर रिडिंग घेण्याचा व बिले वाटण्याचा खर्च वाचेल. विजेचे आॅडिट करता येईल. वीज चोरीची माहिती तात्काळ मिळू शकेल. मीटरमध्ये छेडछाड करता येणार नाही.
 

Web Title: power tariff policy now electricity subsidy will come directly into bank account of consumer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.