lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > महिलांच्या भागीदारीमुळे भारतीय अर्थव्यवस्था वेगवान झाली असती

महिलांच्या भागीदारीमुळे भारतीय अर्थव्यवस्था वेगवान झाली असती

वित्तीय संस्थेचा अहवाल; अमेरिका-चीन व्यापारयुद्धाचा फटका नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 04:44 AM2018-07-26T04:44:40+5:302018-07-26T04:45:32+5:30

वित्तीय संस्थेचा अहवाल; अमेरिका-चीन व्यापारयुद्धाचा फटका नाही

With the participation of women, Indian economy would have been faster | महिलांच्या भागीदारीमुळे भारतीय अर्थव्यवस्था वेगवान झाली असती

महिलांच्या भागीदारीमुळे भारतीय अर्थव्यवस्था वेगवान झाली असती

मुंबई : भारतीय अर्थव्यवस्थेत महिलांची भागीदारी गेल्या २० वर्षात कमी झाली आहे. हे घडले नसते तर भारताची अर्थव्यवस्था अधिक वेगवान झाली असती, असा निष्कर्ष जागतिक वित्तीय सेवा कंपनी डिलोईटे तोशे तोहमात्सू (डिलोईटे)च्या ताज्या अहवालात काढला आहे.
भारतात देशांतर्गत विक्री व निर्यात यांचे प्रमाण व्यस्त आहे, शिवाय बहुतांश लोकसंख्या तरुण आहे. सुधारणावादी सरकार असल्याने अर्थव्यवस्थेवर अमेरिका विरुद्ध चीन या व्यापार युद्धाचा फारसा प्रतिकूल परिणाम होणार नसल्याचे अहवालात म्हटले आहे. भारतीय अर्थव्यवस्थेचे हे अनुकूल घटक आर्थिक प्रगतीसाठी दीर्घकाळ उपयोगी ठरणार आहे. परंतु अमेरिका व चीनच्या अर्थव्यवस्थेत मंदी आली किंवा जागतिक मंदी आली तर त्याचा थोडाबहुत प्रतिकूल परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर होऊ शकतो, असे अहवालात नमूद आहे.
अर्जेंटिनातील आर्थिक संकटाचा उल्लेख करून, डिलोईटेने मेक्सिको, ब्राझील व रशिया यांच्या चलनांचे अवमूल्यन होण्याची शक्यता वर्तवली आहे. पण भारतावर अशी वेळ येण्याची शक्यता नसल्याचे म्हटले आहे. भारताला भ्रष्टाचार, अकार्यक्षमता व पायाभूत सोई/ सुविधांचा अभाव व सरकारी दप्तरदिरंगाईवर मात करावी लागेल असेही डिलोईटेच्या अहवालात म्हटले आहे.

चीनची निर्यात घटल्यास फायदाच
अमेरिका-चीन व्यापार युद्धाचा परिणाम विचारात घेऊनच जागतिक नाणेनिधीने भारताचे सकल राष्ट्रीय उत्पन्न २०१९ मध्ये ७.४० ऐवजी ७.३० टक्याने व २०२० मध्ये ७.८० ऐवजी ७.५० टक्क्याने वाढेल असे भाकीत केल्याचे डिलोईटेने म्हटले आहे. या तणावाने चीनची निर्यात घटल्यास भारतालाही त्याचा फायदा होईल. जागतिक मंदीमुळे वस्तू व ऊर्जा स्वस्त होईल व त्याचा लाभ भारताला होऊ शकतो, असे नमूद केले आहे.

Web Title: With the participation of women, Indian economy would have been faster

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.