lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > पॅन-आधार नंबर लिंक मुदत ३० सप्टेंबरअखेर

पॅन-आधार नंबर लिंक मुदत ३० सप्टेंबरअखेर

तुमचे पॅन कार्ड (पर्मनंट अकाऊंट नंबर) जर ‘आधार’ नंबरला जोडलेले नसेल तर पॅनकार्ड निरुपयोगी ठरेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 04:02 AM2019-07-15T04:02:19+5:302019-07-15T04:02:27+5:30

तुमचे पॅन कार्ड (पर्मनंट अकाऊंट नंबर) जर ‘आधार’ नंबरला जोडलेले नसेल तर पॅनकार्ड निरुपयोगी ठरेल.

 PAN-Aadha number link dated 30th September | पॅन-आधार नंबर लिंक मुदत ३० सप्टेंबरअखेर

पॅन-आधार नंबर लिंक मुदत ३० सप्टेंबरअखेर

नवी दिल्ली : तुमचे पॅन कार्ड (पर्मनंट अकाऊंट नंबर) जर ‘आधार’ नंबरला जोडलेले नसेल तर पॅनकार्ड निरुपयोगी ठरेल. तुमच्या पॅनकार्डचा नंबर आयकर विभागाकडे दिला गेलेला असेल तर तुमच्या आधारचा नंबर आयकर विभागाला कळवणे बंधनकारक आहे. पॅनकार्ड आणि आधारचा नंबर एकमेकांशी जोडणे (लिंक) गरजेचे आहे, अन्यथा पॅनकार्ड निरुपयोगी ठरेल.
तथापि, एखादी व्यक्ती पॅन आणि आधार लिंक करू शकली नाही तर पॅन हे निरुपयोगी केले जाईल. गेल्या आठवड्यात पॅन आणि आधार लिंक करण्याची मुदत ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत वाढवण्यात आली. मुदतीत लिंक झाले नाही तर पॅन निरुपयोगी केले जाईल. एकदा पॅन निरुपयोगी केले गेल्यानंतर ज्या ज्या व्यवहारांसाठी पॅन बंधनकारक आहे ते सगळे व्यवहार करता येणार नाहीत.

Web Title:  PAN-Aadha number link dated 30th September

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.