lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > टाटा समूहाच्या चेअरमनपदाचा वाद, सायरस मिस्त्रींना 'दे धक्का'

टाटा समूहाच्या चेअरमनपदाचा वाद, सायरस मिस्त्रींना 'दे धक्का'

गेल्या 18 महिन्यांपासून सुरु असलेल्या वादावर एनसीएलटीने सुनावणी करत सायरस मिस्त्रींना धक्का दिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2018 04:12 PM2018-07-09T16:12:32+5:302018-07-09T16:13:14+5:30

गेल्या 18 महिन्यांपासून सुरु असलेल्या वादावर एनसीएलटीने सुनावणी करत सायरस मिस्त्रींना धक्का दिला आहे.

NCLT rejects Cyrus Mistry’s plea against Tata Sons | टाटा समूहाच्या चेअरमनपदाचा वाद, सायरस मिस्त्रींना 'दे धक्का'

टाटा समूहाच्या चेअरमनपदाचा वाद, सायरस मिस्त्रींना 'दे धक्का'

मुंबई - नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलने सायरस मिस्त्री यांची याचिका फेटाळली आहे. टाटा समूहाच्या चेअरमन पदावरुन मिस्त्री यांना हटविण्यात आले होते. त्याविरोधात मिस्त्री यांनी एनसीएलटीकडे अपील केले होते. त्यावर सुनावणी करताना, बोर्डाला मिस्त्री यांच्यावर भरोसा नसल्याचे सांगत एनसीएलटीने ही याचिका फेटाळली. 

टाटा समूहाच्या अध्यक्षपदी सायरस मिस्त्री यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, काही दिवसांतच समूहाच्या बोर्ड मिटींगमध्ये सायरस मिस्त्री यांना पदावरुन हटविण्याचा निर्णय घेण्यात आला. मिस्त्री यांनी कंपनीतील गुप्त माहिती लीक केल्याचा आरोप ठेवत त्यांची उचलबांगडी करण्यात आली. याप्रकरणी मिस्त्री यांनी एनसीएलटीकडे याचिका दाखल करुन न्याय मागितला. गेल्या 18 महिन्यांपासून टाटा आणि मिस्त्री यांच्यात हा वाद सुरू होता. मात्र, एनसीएलटीने टाटा समूहाच्या बाजूने निर्णय देत मिस्त्री यांना धक्का दिला. तसेच पदावरुन हटविण्याचे अधिकार बोर्डाला असल्याचे आपल्या आदेशात म्हटले. तर रतन टाटा यांच्यावर लावण्यात आलेले आरोपही फेटाळले असून टाटा समूह व्यवस्थापनात कुठलिही गडबड नसल्याचे एनसीएलटीने आदेशात म्हटले आहे.

Web Title: NCLT rejects Cyrus Mistry’s plea against Tata Sons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.