lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > बहुतांश बीपीओ कर्मचारी वर्णभेदी शिव्यांमुळे सतत तणावाखाली

बहुतांश बीपीओ कर्मचारी वर्णभेदी शिव्यांमुळे सतत तणावाखाली

भारतातील बिझनेस प्रोसेस आऊटसोर्सिंग (बीपीओ) केंद्रांवर काम करणा-या बहुतांश कर्मचा-यांना वर्णभेदी शिव्या आणि ताणतणावांचा सामना करावा लागतो, असे एका अभ्यासातून समोर आले आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 12:58 AM2017-11-29T00:58:43+5:302017-11-29T00:59:23+5:30

भारतातील बिझनेस प्रोसेस आऊटसोर्सिंग (बीपीओ) केंद्रांवर काम करणा-या बहुतांश कर्मचा-यांना वर्णभेदी शिव्या आणि ताणतणावांचा सामना करावा लागतो, असे एका अभ्यासातून समोर आले आहे.

 Most of the BPO employees are constantly stressed due to separation of Shiva | बहुतांश बीपीओ कर्मचारी वर्णभेदी शिव्यांमुळे सतत तणावाखाली

बहुतांश बीपीओ कर्मचारी वर्णभेदी शिव्यांमुळे सतत तणावाखाली

नवी दिल्ली : भारतातील बिझनेस प्रोसेस आऊटसोर्सिंग (बीपीओ) केंद्रांवर काम करणाºया बहुतांश कर्मचाºयांना वर्णभेदी शिव्या आणि ताणतणावांचा सामना करावा लागतो, असे एका अभ्यासातून समोर आले आहे. पाश्चात्त्य ग्राहक आमच्या नोकºया पळविणारे म्हणून या कर्मचाºयांना शिव्या देतात. तसेच वर्णद्वेषी टिप्पण्याही करतात.
ब्रिटनमधील केंट विद्यापीठातील तज्ज्ञांनी दोन जागतिक बीपीओ संस्थांच्या केंद्रांचा अभ्यास करून त्यासंबंधीचा अहवाल जारी केला आहे. त्यातील एक संस्था २०१२ पासून भारतात केंद्रे चालविते. या केंद्रांवर ३.३ लाख भारतीय काम करतात. दुसरी संस्था फिलिपिन्समधील असून, तेथे ३.५ लाख लोक काम करतात. या केंद्रांवर ग्राहकांशी संबंधित सेवा दिल्या जातात.
अहवालाच्या लेखिका श्वेता राजन-रानकीन यांनी सांगितले की, मंदीनंतरच्या काळात पाश्चात्त्य लोक कमालीचे बिथरले आहेत. तुम्ही भारतीय असल्याचे समजताच ते तुम्हाला त्यांच्या नोकºया पळविणारे समजतात. एका बीपीओ कर्मचाºयाने सांगितले की, शिव्या तर रोजच मिळतात. दिवसातून एक-दोन वेळा असा प्रसंग येतोच. फोन करणारे लोक ‘यू इंडियन्स...’ असे म्हणून वाईटसाईट बोलू लागतात.
श्वेता यांनी सांगितले की, ब्रिटनमधील ब्रेक्झिट आणि अमेरिकेतील ट्रम्प यांचे आगमन या पार्श्वभूमीवर अलीकडे अशा घटना वाढल्या आहेत.
श्वेता यांनी सांगितले की, १९९० मध्ये जेव्हा आऊटसोर्सिंग सुरू झाले, तेव्हा कंपन्यांनी पूर्णत: झाकपाक केली. कर्मचारी भारतीय आहे, हे पाश्चात्त्य ग्राहकास कळता कामा नये, कॉल सेंटरवरील कर्मचाºयांचे बोलणे पूर्ण पाश्चात्त्य वाटायला हवे, असा त्यांचा कटाक्ष होता.
आपण आपल्याच देशातील कॉल सेंटरशी बोलत आहोत,असे पाश्चात्त्यांना वाटले पाहिजे,
यावर भर दिला जात होता. पाश्चात्त्यांच्या लकबीनुसार बोलणे शिकण्यासाठी कर्मचाºयांना अमेरिकेत पाठविले जात होते. आता त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. पाश्चात्त्य ग्राहक भारतीय कर्मचा-यांना शिव्या देत आहेत.

डोळ्यांत सतत पाणीच

श्वेता यांनी सांगितले की, हैदराबादची एक मुलगी प्रत्येक कॉल घेतल्यानंतर शिव्यांनी व्यथित होऊन वॉशरूमला जाऊन रडून येते. बीपीओ कर्मचारी मनोरमा राठोड यांनी सांगितले की, आम्ही त्यांच्याच देशातून बोलत आहोत, यावर ते लोक विश्वासच ठेवत नाहीत. गुरगाव येथील कोलंबिया एशिया हॉस्पिटलचे मानसशास्त्रज्ञ डॉ. श्वेता शर्मा यांनी सांगितले की, द्वेषपूर्ण संभाषणामुळे कर्मचाºयांना तणावाचा सामना करावा लागतो. त्यातून वजन वाढण्यासारख्या अनेक समस्या निर्माण होतात.

Web Title:  Most of the BPO employees are constantly stressed due to separation of Shiva

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Crimeगुन्हा