lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > विमानात मोबाइल वापराचे नियम आठवडाभरात

विमानात मोबाइल वापराचे नियम आठवडाभरात

विमानात मोबाइलवर इंटरनेट आणि व्हाइस कॉल करण्याच्या सुविधेचे नियम तयार करण्यासाठी पुढील आठवड्यात दूरसंचार खाते आणि उड्डयन मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 01:22 AM2018-05-11T01:22:33+5:302018-05-11T01:22:33+5:30

विमानात मोबाइलवर इंटरनेट आणि व्हाइस कॉल करण्याच्या सुविधेचे नियम तयार करण्यासाठी पुढील आठवड्यात दूरसंचार खाते आणि उड्डयन मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे.

 Mobile usage rules in the plane over a week | विमानात मोबाइल वापराचे नियम आठवडाभरात

विमानात मोबाइल वापराचे नियम आठवडाभरात

नवी दिल्ली -  विमानात मोबाइलवर इंटरनेट आणि व्हाइस कॉल करण्याच्या सुविधेचे नियम तयार करण्यासाठी पुढील आठवड्यात दूरसंचार खाते आणि उड्डयन मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे.
विकसित देशांत विमानात मोबाइल फोन वापरास याआधीच परवानगी दिली गेली आहे. दूरसंचार आयोगाने १ मे रोजी यासंबंधीच्या प्रस्तावाला मंजुरी देऊन भारतातही उड्डाणकालीन जोडणीचा (इन-फ्लाईट कनेक्टिव्हिटी) मार्ग मोकळा केला आहे. या निर्णयामुळे भारतीय हवाई हद्दीत असताना विमान प्रवाशांना मोबाइल फोनवर इंटरनेट आणि व्हॉइस कॉल सुविधा उपलब्ध होईल.
दूरसंचार सचिव अरुणा सुंदरराजन यांनी सांगितले की, येत्या सोमवारी (१४ मे) किंवा मंगळवारी (१५ मे) नागरी विमान वाहतूक मंत्रालयातील अधिकाºयांसोबत आम्ही बैठक घेणार आहोत. दूरसंचार कंपन्यांना कदाचित बैठकीला बोलावले जाईल वा नाही. या बैठकीत उड्डाणकालीन जोडणीच्या चौकटीवर निर्णय होईल. या निर्णयाची अंमलबजावणी ३-४ महिन्यांत होईल, असे सुंदरराजन यांनी यापूर्वी सांगितले होते.

टेकआॅफ, लँडिंगवेळी मात्र बंदच

दूरसंचार आयोगाने दिलेल्या निर्णयानुसार, विमानाचे टेकआॅफ आणि लँडिंग या वेळी मोबाइल फोनवर बंदीच राहील. मात्र, विमान आकाशात ठरावीक पातळीच्या वर गेल्यानंतर प्रवाशांना मोबाइल फोन सुरू करता येतील. जगातील अनेक विमान वाहतूक कंपन्यांनी आपल्या विमानांत वाय-फाय सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

Web Title:  Mobile usage rules in the plane over a week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.