lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > विक्रीच्या माऱ्याने बाजार आपटला; गाठला एक महिन्याचा नीचांक

विक्रीच्या माऱ्याने बाजार आपटला; गाठला एक महिन्याचा नीचांक

एफएमसीजी, धातू, वाहन आणि वित्तीय सेवा क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांत विक्रीचा जबरदस्त भडिमार झाल्यामुळे मंगळवारी भारतीय शेअर आपटले.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2018 12:28 AM2018-09-12T00:28:03+5:302018-09-12T00:28:12+5:30

एफएमसीजी, धातू, वाहन आणि वित्तीय सेवा क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांत विक्रीचा जबरदस्त भडिमार झाल्यामुळे मंगळवारी भारतीय शेअर आपटले.

Market hits market; One month low on the rise | विक्रीच्या माऱ्याने बाजार आपटला; गाठला एक महिन्याचा नीचांक

विक्रीच्या माऱ्याने बाजार आपटला; गाठला एक महिन्याचा नीचांक

मुंबई : एफएमसीजी, धातू, वाहन आणि वित्तीय सेवा क्षेत्रातील कंपन्यांच्या समभागांत विक्रीचा जबरदस्त भडिमार झाल्यामुळे मंगळवारी भारतीय शेअर आपटले. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ५0९ अंकांनी आपटून एक महिन्याच्या नीचांकावर गेला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही दीडशेपेक्षा जास्त अंकांनी गडगडला.
सूत्रांनी सांगितले की, जागतिक व्यापार युद्धाचा धोका वाढल्यामुळे बाजार खाली आले आहेत. रुपयाने आणखी ऐतिहासिक नीचांक गाठल्यानंतर शेअर बाजारांत निराशा पसरली. मुंबई शेअर बाजाराचा ३0 कंपन्यांचा सेन्सेक्स ५0९.0४ अंकांनी घसरून ३७,४१३.१३ अंकांवर बंद झाला.
हा सेन्सेक्सचा २ आॅगस्टनंतरचा नीचांकी बंद ठरला. सेन्सेक्सला सलग दुसºया सत्रात मोठी घसरण सोसावी लागली. आदल्या सत्रात सेन्सेक्स ४६७.६५ अंकांनी घसरला होता. ५0 कंपन्यांचा राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १५0.६0 अंकांनी घसरून ११,२८७.५0 अंकांवर बंद झाला.
टाटा स्टील, पॉवर ग्रीड, आयटीसी, हिंदुस्तान युनिलिव्हर,
हीरो मोटोकॉर्प, टाटा मोटर्स,
मारुती सुझुकी, बजाज आॅटो, एचडीएफसी लि., एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, येस बँक, आयसीआयसीआय बँक, अदाणी पोर्टस्, कोटक बँक, टीसीएस,
वेदांता लि., आरआयएल, सन
फार्मा, एसबीआय, एलअँडटी,
विप्रो, इंडसइंड बँक, अ‍ॅक्सिस बँक यांचे समभाग घसरले.
कोल इंडिया, एनटीपीसी, एमअँडएम आणि एशियन पेंटस् या कंपन्यांचे समभाग वाढल्यामुळे सेन्सेक्सची घसरण काही प्रमाणात मर्यादित राहण्यास मदत झाली. इन्फोसिसचे समभागही वाढले.
>बाजारातील सूत्रांनी सांगितले की, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, भारताची वाढती व्यापारी तूट, अमेरिकी फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरांत वाढ केली जाण्याची शक्यता आणि जागतिक बाजारातील नकारात्मक बातम्या ही बाजाराच्या घसरणीची आणखी काही कारणे आहेत.

Web Title: Market hits market; One month low on the rise

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.