lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > एका सेंकदात जाणून घ्या तुमच्या PF ची माहिती

एका सेंकदात जाणून घ्या तुमच्या PF ची माहिती

सर्व सदस्यांसाठी ही सेवा मोफत उपलब्ध आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2018 02:44 PM2018-03-13T14:44:31+5:302018-03-13T14:44:31+5:30

सर्व सदस्यांसाठी ही सेवा मोफत उपलब्ध आहे. 

Know the information about your PF in one transaction | एका सेंकदात जाणून घ्या तुमच्या PF ची माहिती

एका सेंकदात जाणून घ्या तुमच्या PF ची माहिती

नवी दिल्ली : नोकरदार वर्गासाठी महत्वाच्या असलेल्या कर्मचारी भविष्य निधी (पीएफ)ची माहिती आता एका मिस कॉलवर मिळणार आहे. PF ची माहिती मिळवण्यासाठी तुमच्या रजिस्टर असलेल्या फोनवरुन एक मिस कॉल द्यायची गरज आहे. 011-22901406 या नंबरवर मिस कॉल द्या आणि तुमच्या PF ची माहिती मिळवा. मात्र या सुविधेचा लाभ घेण्यासाठी युनिफाईड पोर्टलचे युएएन सक्रिय असणे आवश्यक आहे.  सर्व सदस्यांसाठी ही सेवा मोफत उपलब्ध आहे. 

यूएएन सक्रिय सदस्य आपल्या रजिस्टर मोबाईल नंबरवरुन 77382-99899 या नंबरवर एसएमएस पाठवून ईपीएफओकडे उपलब्ध बचत आणि पीएफ योगदानाची माहिती मिळवू शकतात. त्यासाठी ईपीएफओएचओ यूएएन  असे टाईप करुन 77382-99899 या नंबरवर पाठवा. ही सुविधा एकूण दहा भाषांत उपलब्ध आहे. इंग्रजी, हिंदी, पंजाबी, गुजराती, मराठी, कन्नड, तेलगु, तामिळ, मल्याळम आणि बांग्ला या भाषांमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे.

ज्या सदस्याचे यूएएन नंबर बँक खाते, आधार आणि पॅन कार्डशी जोडले गेले असले तरच सर्व माहिती मिळते. मिस कॉल आणि एसएमएसच्या माध्यमातून माहिती प्राप्त करण्याची सुविधा उमंग या अॅपवर उपलब्ध आहे.

 

Web Title: Know the information about your PF in one transaction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.