lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > आर्थिक स्थिती बिघडल्याने जेट एअरवेजने एतिहादकडे मागितले ७५० कोटी रुपये

आर्थिक स्थिती बिघडल्याने जेट एअरवेजने एतिहादकडे मागितले ७५० कोटी रुपये

सेवाच बंद पडण्याची भीती, ५0 विमानांचे उड्डाण बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 02:05 AM2019-03-13T02:05:45+5:302019-03-13T02:06:01+5:30

सेवाच बंद पडण्याची भीती, ५0 विमानांचे उड्डाण बंद

Jet Airways asked Etihad Rs 750 crores after the economic downturn | आर्थिक स्थिती बिघडल्याने जेट एअरवेजने एतिहादकडे मागितले ७५० कोटी रुपये

आर्थिक स्थिती बिघडल्याने जेट एअरवेजने एतिहादकडे मागितले ७५० कोटी रुपये

नवी दिल्ली : जेट एअरवेजचे अध्यक्ष नरेश गोयल यांनी आपला भागीदार एतिहादकडे तातडीने ७५० कोटी रुपयांची मागणी केली आहे. गोयल म्हणाले, विमान कंपनीची आर्थिक अवस्था आधीच खूप डळमळीत झाली असून तिच्या ५० विमानांचे उड्डाण बंद केल्यामुळे तर ती कमालीची विकोपाला गेली आहे.

गोयल यांनी एतिहाद गटाचे मुख्य कार्यकारी टोनी डग्लस यांना ८ मार्च रोजी लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, हा अंतरिम निधी लवकरात लवकर मिळाला नाही तर कंपनीचे भवितव्य गंभीररित्या धोक्यात येईल एवढेच नाही तर ती बंदही पडू शकते. गोयल त्यात म्हणतात की, हा अंतरिम निधी मिळण्यासाठी जेटप्रिव्हिलेजमध्ये जेट एअरवेजचे भाग तारण ठेवण्यास उड्डयन मंत्रालयाकडून विमान कंपनीने परवानगीही मिळवली आहे. जेट एअरवेजची ४९.९ टक्के मालकी आहे तर उर्वरीत एतिहादची आहे.

विमान कंपनी वाचवण्यासाठी पुढील आठवड्यात तातडीने ७५० कोटी रूपये निधी उपलब्ध करून देऊन विमान कंपनी वाचवण्यासाठी तुमचा पाठिंबा आणि सहकार्य मिळेल, असे मला आता वाटते. हा निधी मिळाल्यास ठरलेल्या योजनेनुसार तेवढी रक्कम बँकांकडूनही उपलब्ध होईल, असे नरेश गोयल यांनी पत्रात म्हटले आहे.

कर्जाचे रोख्यांत रूपांतर
एतिहादच्या संचालक मंडळाची बैठक सोमवारी जेटच्या योजनेवर विचार करण्यास होणार आहे. एप्रिल २०१४ पासून जेट एअरवेजचा हवाई व्यवसायात २४ टक्के वाटा आहे. १४ फेब्रुवारी रोजी विमान कंपनीच्या संचालक मंडळाने कर्जाच्या पुनर्रचनेच्या योजनेला मान्यता दिली. या योजनेनुसार कंपनीला कर्ज देणारे कर्जाचे रूपांतर रोख्यांमध्ये अवघ्या एक रुपया किमतीत करून सर्वात मोठे भागधारक बनणार आहेत. अशा व्यवहाराला भागधारकांनीही २१ फेब्रुवारी रोजी मान्यता दिली आहे.

Web Title: Jet Airways asked Etihad Rs 750 crores after the economic downturn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.