lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज >  'इंडिगो'ची हवाई सफर अवघ्या 1,111 रुपयांत !

 'इंडिगो'ची हवाई सफर अवघ्या 1,111 रुपयांत !

हवाई प्रवास करणा-यांसाठी एक खुशखबर आहे. इंडिगो एअरलाइन्स कंपनी आपल्या प्रवाशांसाठी अवघ्या 1,111 रुपयांत देशातंर्गत  हवाई प्रवास करण्याची संधी देत आहे. विमान व्यवसायात इंडिगो एअरलाइन्स कंपनीला अकरा वर्षे पूर्ण झाली. त्यामुळे इंडिगो एअरलाइन्सकडून प्रवाशांसाठी ही विशेष ऑफर सुरु करण्यात आली आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2017 06:23 PM2017-08-02T18:23:48+5:302017-08-02T18:24:16+5:30

हवाई प्रवास करणा-यांसाठी एक खुशखबर आहे. इंडिगो एअरलाइन्स कंपनी आपल्या प्रवाशांसाठी अवघ्या 1,111 रुपयांत देशातंर्गत  हवाई प्रवास करण्याची संधी देत आहे. विमान व्यवसायात इंडिगो एअरलाइन्स कंपनीला अकरा वर्षे पूर्ण झाली. त्यामुळे इंडिगो एअरलाइन्सकडून प्रवाशांसाठी ही विशेष ऑफर सुरु करण्यात आली आहे. 

'Indigo' travels for only Rs 1,111! |  'इंडिगो'ची हवाई सफर अवघ्या 1,111 रुपयांत !

 'इंडिगो'ची हवाई सफर अवघ्या 1,111 रुपयांत !

नवी दिल्ली, दि. 2 - हवाई प्रवास करणा-यांसाठी एक खुशखबर आहे. इंडिगो एअरलाइन्स कंपनी आपल्या प्रवाशांसाठी अवघ्या 1,111 रुपयांत देशातंर्गत  हवाई प्रवास करण्याची संधी देत आहे. विमान व्यवसायात इंडिगो एअरलाइन्स कंपनीला अकरा वर्षे पूर्ण झाली. त्यामुळे इंडिगो एअरलाइन्सकडून प्रवाशांसाठी ही विशेष ऑफर सुरु करण्यात आली आहे. 
इंडिगो एअरलाइन्सच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, देशांतर्गत मुंबई, गोवा, बंगऴुरु, गुवाहटी, कोलकाता, चेन्नई आणि पुणे या ठिकाणचा प्रवास करण्यासाठी ही विशेष ऑफर चालू करण्यात आली आहे. तसेच, इंडिगो एअरलाइन्सची ही विशेष ऑफर फक्त 2 ऑगस्ट ते 6 ऑगस्टपर्यंत बुक करता येणार आहे. या दिवसांत बुक केलेल्या प्रवाशांसाठी 21 ऑगस्ट ते 24 मार्चच्या दरम्यान प्रवास करता येणार आहे. 
भारतात इंडिगो एअरलाइन्सला अकरा वर्ष पूर्ण झाली आहेत. ही एकप्रकारे यशस्वी कामगिरी असून आगामी वर्षात सुद्धा चांगले यश संपादन करण्याचा हेतू आहे. या आनंदात इंडिगो एअरलाइन्सकडून आपल्या प्रवाश्यांना ही विशेष ऑफर दिली आहे. ही ऑफर प्रवाशांसाठी सुखद अनुभव देणारी ठरेल, असे इंडिगो एअरलाइन्सचे अध्यक्ष आदित्य घोष यांनी सांगितले.  
याआधी सुद्धा इंडिगो एअरलाइन्सने मान्सूनसाठी प्रवाशांना विशेष सवलत देण्यात आली होती. याचबरोबर, विस्तारा, स्पाईसजेट आणि एअर इंडियाकडूनदेखील मान्सूनसाठी विशेष सवलत घोषित करण्यात आली होती. मान्सून विशेष सवलतमध्ये एअर इंडियाचे देशांतर्गत प्रवासासाठीचे तिकिट मूल्य 706 रुपये होते. 


 

Web Title: 'Indigo' travels for only Rs 1,111!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.