lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > भारताची ब्रिटनमध्ये गुंतवणूक भरारी!

भारताची ब्रिटनमध्ये गुंतवणूक भरारी!

२0१५ या वर्षात ब्रिटनमध्ये भारतीय कंपन्यांची गुंतवणूक ६५ टक्के वाढली.

By admin | Published: April 30, 2016 05:18 AM2016-04-30T05:18:11+5:302016-04-30T05:18:11+5:30

२0१५ या वर्षात ब्रिटनमध्ये भारतीय कंपन्यांची गुंतवणूक ६५ टक्के वाढली.

India invested in Britain! | भारताची ब्रिटनमध्ये गुंतवणूक भरारी!

भारताची ब्रिटनमध्ये गुंतवणूक भरारी!

लंडन : २0१५ या वर्षात ब्रिटनमध्ये भारतीय कंपन्यांची गुंतवणूक ६५ टक्के वाढली. आता त्या देशात अमेरिका आणि फ्रान्सनंतर भारत हा थेट विदेशी गुंतवणुकीच्या दृष्टीने तिसऱ्या क्रमांकाचा देश बनला आहे. येथे जारी करण्यात आलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.
अहवालानुसार, ब्रिटनमध्ये तीव्र वृद्धी करणाऱ्या भारतीय कंपन्यांची संख्या वर्षभरापूर्वी ३६ होती, ती वाढून ६२ झाली. ज्यांचा व्यवसाय १0 टक्क्यांपेक्षा जास्त वेगाने होत आहे, अशा कंपन्यांचा या श्रेणीत समावेश करण्यात आला आहे. ‘ग्रँट थार्नटन यू के एलएलपी’ या संस्थेने ‘सीआयआय’ या भारतीय औद्योगिक संघटनेशी मिळून हा अहवाल तयार केला. अहवालानुसार तीव्र वृद्धी करणाऱ्या भारतीय कंपन्यांचा एकूण व्यवसाय २0१५मध्ये वाढून २६
अब्ज पाऊंड होता. ‘ग्रँट थार्नटन’मधील दक्षिण आशियाचे समूहप्रमुख अनुज चंद म्हणाले की, भारतीय कंपन्यांद्वारे ब्रिटनमध्ये गुंतवणूक वाढल्याचे स्पष्ट दिसते.
>पाच मोठ्या कंपन्या
भारती एअरटेल, एचसीएल, अपोलो टायर्स आणि वोखार्ड या भारताच्या पाच मोठ्या कंपन्यांची ब्रिटनमध्ये गुंतवणूक आहे. येथील भारतीय कंपन्यात १,१0,000 कर्मचारी कार्यरत आहेत. त्यात आॅटोमोटिव्ह सेक्टरचा मोठा वाटा आहे. या विभागात ३६ टक्के कर्मचारी आहेत.

Web Title: India invested in Britain!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.