lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > तात्पुरती पेन्शन घेणाऱ्यांना सुधारित निवृत्तीवेतन

तात्पुरती पेन्शन घेणाऱ्यांना सुधारित निवृत्तीवेतन

सेवानिवृत्त शासकीय कर्मचाऱ्यांना तात्पुरते निवृत्तीवेतन (प्रोव्हिजनल पेन्शन) दिले जाते.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2019 04:06 AM2019-07-15T04:06:22+5:302019-07-15T04:06:31+5:30

सेवानिवृत्त शासकीय कर्मचाऱ्यांना तात्पुरते निवृत्तीवेतन (प्रोव्हिजनल पेन्शन) दिले जाते.

Improved pensions for temporary pensioners | तात्पुरती पेन्शन घेणाऱ्यांना सुधारित निवृत्तीवेतन

तात्पुरती पेन्शन घेणाऱ्यांना सुधारित निवृत्तीवेतन

- विश्वास खोड 
मुंबई : विभागीय चौकशी किंवा न्यायालयीन चौकशी सुरू आहे, या व अन्य कारणांमुळे सेवानिवृत्त शासकीय कर्मचाऱ्यांना तात्पुरते निवृत्तीवेतन (प्रोव्हिजनल पेन्शन) दिले जाते. पुण्यातील यशदा संस्थेतील मोफत सल्ला कक्षाच्या पाठपुराव्यामुळे त्यांना सुधारित निवृत्तीवेतनाचा लाभ मिळणार आहे.
विभागीय चौकशी किंवा न्यायालयीन चौकशी सुरू असणाºया राज्यातील कर्मचारी, अधिकाºयांना वेतन आयोगाच्या शिफारशीनंतर मिळणारे तात्पुरते निवृत्तीवेतन सुधारित केले जात नसे. मात्र प्रत्येक वेतन आयोगाच्या शिफारशी लागू करताना अशा प्रकरणात केंद्रीय कर्मचाºयांना मात्र तात्पुरते निवृत्तीवेतन सुधारित केले जात असे.
याच धर्तीवर राज्य शासकीय कर्मचाºयांचे तात्पुरते निवृत्तीवेतन सुधारित करण्यात यावे, अशी विनंती यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीच्या (यशदा) मोफत सल्ला कक्षातर्फे वित्त विभागास करण्यात आली होती. या अनुषंगाने नुकतीच प्रधान सचिव, वित्त (लेख व कोषागारे) यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. मोफत सल्ला कक्षातर्फे करण्यात आलेली सूचना सरकारने मान्य केली.
१ जानेवारी २०१६ पूर्वी निवृत्त झालेल्या व विविध कारणांमुळे तात्पुरते निवृत्तीवेतन घेणाºया सेवानिवृत्त वेतनधारकांचे तात्पुरते निवृत्तीवेतन सातव्या आयोगाच्या शिफारशीनुसार म्हणजेच २४ जानेवारी २०१९ च्या शासन निर्णयातील सूचनांनुसार सुधारित करण्यात यावे, अशा सूचना सरकारने नुकत्याच केलेल्या आहेत, असे मोफत सल्ला कक्षातील सूत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले. या निर्णयामुळे तात्पुरते निवृत्तीवेतन घेणाºयांना मोठा लाभ होणार आहे.

Web Title: Improved pensions for temporary pensioners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.