lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > भारत थांबविणार इराणी तेलाची आयात; पर्यायी स्रोतांचा वापर

भारत थांबविणार इराणी तेलाची आयात; पर्यायी स्रोतांचा वापर

सौदी अरेबिया, कुवैत, यूएई आणि मेक्सिकोचा विचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2019 03:52 AM2019-04-24T03:52:38+5:302019-04-24T03:52:50+5:30

सौदी अरेबिया, कुवैत, यूएई आणि मेक्सिकोचा विचार

Import of Iran oil will be stopped; Use of alternative sources | भारत थांबविणार इराणी तेलाची आयात; पर्यायी स्रोतांचा वापर

भारत थांबविणार इराणी तेलाची आयात; पर्यायी स्रोतांचा वापर

नवी दिल्ली : अमेरिकेने निर्बंधातील सवलत रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर भारत इराणकडून कच्चे तेल खरेदी करणे थांबविणार आहे. त्यामुळे निर्माण होणारी तेलाची तूट सौदी अरेबियासारख्या देशांकडून तेल खरेदी करून भरून काढली जाणार आहे.

अमेरिकेने इराणवर आर्थिक निर्बंध लावल्यानंतर भारत आणि चीनसह काही देशांना त्यातून सवलत दिली होती. त्यामुळे भारत इराणकडून तेल खरेदी करीत होता. तथापि, आता अमेरिकेने ही सवलत काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. या स्थितीत भारताने इराणकडून तेल खरेदी सुरूच ठेवल्यास अमेरिकेकडून भारतावरही निर्बंध लावले जाऊ शकतात. त्यामुळे भारताला इराणी तेल खरेदी करणे थांबवावेच लागणार आहे.

उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले की, भारत हा इराणी तेलाचा दुसरा मोठा ग्राहक आहे. २०१८-१९ या वित्त वर्षात भारताने इराणकडून २४ दशलक्ष टन कच्चे तेल खरेदी केले होते. इराणला पर्याय म्हणून सौदी अरेबिया, कुवैत, यूएई आणि मेक्सिको या देशांकडून भारत तेल घेऊ शकतो. तेलमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी एका टष्ट्वीटमध्ये म्हटले की, इतर मोठ्या तेल उत्पादक देशांकडून तेल खरेदी करण्याची योजना तयार आहे. भारताची राष्ट्रीय गरज भागविण्यासाठी आपल्या रिफायनरीज पूर्णत: तयार आहेत.

हे मोदी सरकाचे अपयश; काँग्रेसचा हल्लाबोल
इराणकडून तेल खरेदीची सवलत देणाऱ्या निर्णयास अमेरिकेकडून मुदतवाढ मिळविण्यात मोदी कमी पडले आहे. हे मुत्सद्देगिरीचे तसेच आर्थिक पातळीवरील अपयश आहे.
काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले की, कच्च्या तेलाच्या किमती सहा महिन्यांच्या उच्चांकावर आहेत. डॉलरच्या तुलनेत रुपया ६९.६१ वर घसरला आहे आणि अशा बिकट परिस्थितीत अमेरिकेने इराकडून तेल खरेदी करण्यास भारताला मनाई केली आहे.

Web Title: Import of Iran oil will be stopped; Use of alternative sources

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.