lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > एचएएलकडे फक्त १४० कोटी शिल्लक

एचएएलकडे फक्त १४० कोटी शिल्लक

आधीच अडचणीत असलेल्या हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडची (एचएएल) अवस्था आणखी खंगली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 05:02 AM2019-05-29T05:02:51+5:302019-05-29T05:02:57+5:30

आधीच अडचणीत असलेल्या हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडची (एचएएल) अवस्था आणखी खंगली आहे.

HAL has only 140 million balances | एचएएलकडे फक्त १४० कोटी शिल्लक

एचएएलकडे फक्त १४० कोटी शिल्लक

बंगळुरू : आधीच अडचणीत असलेल्या हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडची (एचएएल) अवस्था आणखी खंगली आहे. संरक्षण मंत्रालयाकडून १४ हजार कोटी रुपये येणे बाकी असल्याने ३१ मार्च २०१९ नुसार एचएएलच्या तिजोरीत फक्त १४० कोटी रुपये उरले आहेत. सर्व उत्पादने आणि सेवेची बिले संरक्षण मंत्रालयाकडे थकीत आहेत. यापैकी बव्हंशी रक्कम आणि भारतीय वायू दलाकडे थकीत आहे. एचएएलच्या थकीत बिलासंबंधी २ आणि ३ एप्रिल रोजी विचारणा करूनही संरक्षण मंत्रालय आणि भारतीय वायू दलाकडून प्रतिसाद मिळाला नाही.
२००३-०४ ते २०१८-१९ च्या आकडेवारीनुसार एचएएलची शिल्लक एवढ्या कमी प्रमाणात नव्हती. २००३-०४ मध्ये एचएएलच्या हाती ४,८४१ कोटी रुपयांची शिल्लक होती. ३१ मार्च २०१८ च्या आकडेवारीनुसार एचएएलकडील शिल्लक ९८ टक्क्यांनी कमी झाली. एचएएलची एकूण येणे बाकी रक्कम ७,७४१ कोटी रुपयांवरून जवळपास दुप्पट झाली आहे.
आर्थिक समस्या निर्माण झालेली असतानाही एचएएलच्या उत्पादनांच्या मागणीची स्थिती स्थिर होती. ३१ मार्च २०१७ च्या आकडेवारीनुसार मागणीचा आकडा ५८ हजार कोटी रुपये होता. यापैकी १२ सुखोई-३० एमकेआय विमानांसाठी ५० हजार कोटींची मागणी नोंदविण्यात आली आहे. मार्च २०२० पर्यंत एचएएल ही विमाने वितरित करण्याची शक्यता आहे. यात ध्रुव आणि चित्ता हेलिकॉप्टरही आहे. आता १ लाख कोटींच्या उत्पादनांसाठी मागणी नोंदविली जाणार आहे, असे संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांनी जानेवारीत सांगितले होते. यात ८३ लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट-तेजससाठी ५० हजार कोटी, २०० कामोव्ह हेलिकॉप्टर्ससाठी २० हजार कोटी, १५ लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर्स, १९ डोर्नियर विमाने आणि एसयू-३० अद्ययावत करण्यासाठी असल्याचे म्हटले
होते. (वृत्तसंस्था)
>लाभांश आणि समभाग फेरखरेदी
आर्थिक स्थिती बिकट असतानाही एचएएलने २०१८-१९ मध्ये केंद्र सरकारला ६६२ कोटी रुपयांचा आणखी अंतरिम लाभांश दिला. याव्यतिरिक्त २००३-०४ ते २०१७-१८ दरम्यान ८,९९६ कोटींचा लाभांश देण्यात आला होता. यापैकी पन्नास टक्के लाभांश मागच्या पाच वर्षांत देण्यात आला.
शिवाय एचएएलच्या इतिहासात पहिल्यांदाच मागील चार वर्षांत समभाग (शेअर्स) फेरखरेदीसाठी ६,३९३ कोटी रुपये मोजले. २०१५-१६ मध्ये पहिल्यांदा ५,२६५ कोटी रुपयांचे समभाग पुन्हा खरेदी करण्यात आले. २०१७-१८ मध्येही दुसऱ्यांदा १,१२८ कोटींचे समभाग पुन्हा खरेदी करण्यात आले.
>नगदी स्थिती
डिसेंबर २०१८ मध्ये ९६२ कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात आले. त्यावेळी एचएएलकडील शिल्लक पहिल्यांदाच नकारात्मक प्रमाणात होती. ३१ डिसेंबरनुसार सशस्त्र दलाकडून १५,७०० कोटी रुपये येणे बाकी आहेत. थकबाकीचा आकडा ३१ मार्चपर्यंत २० हजार कोटी रुपयांवर जाऊ शकतो. तथापि, संरक्षण मंत्रालयाने काही बिले चुकती केली असली तरी मार्च २०१९ अखेर १३, ९३८ कोटी रुपये थकीत आहेत, असे एचएएलचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक आर. माधवन यांनी सांगितले.

Web Title: HAL has only 140 million balances

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.