lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > गाझियाबादच्या निकेश यांना 858 कोटींचं पॅकेज, जगातल्या नंबर 1 सायबर सिक्युरिटी कंपनीचे बनले सीईओ

गाझियाबादच्या निकेश यांना 858 कोटींचं पॅकेज, जगातल्या नंबर 1 सायबर सिक्युरिटी कंपनीचे बनले सीईओ

मेरिकेतल्या पालो आल्टो नेटवर्क्स इंकचे सीईओ आणि चेअरमन बनले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2018 01:54 PM2018-06-06T13:54:32+5:302018-06-06T14:06:50+5:30

मेरिकेतल्या पालो आल्टो नेटवर्क्स इंकचे सीईओ आणि चेअरमन बनले आहेत.

Ghaziabad's Nikesh has a package of 858 crores, CEO of the world's number 1 cyber security company. | गाझियाबादच्या निकेश यांना 858 कोटींचं पॅकेज, जगातल्या नंबर 1 सायबर सिक्युरिटी कंपनीचे बनले सीईओ

गाझियाबादच्या निकेश यांना 858 कोटींचं पॅकेज, जगातल्या नंबर 1 सायबर सिक्युरिटी कंपनीचे बनले सीईओ

नवी दिल्ली- गेल्या काही दिवसांपासून जगभरात टेक्नॉलॉजीचा प्रभाव विस्तारत चालला आहे. टेक्नॉलॉजीच्या जमान्यात जपानची टेलिकॉम कंपनी असलेल्या सॉफ्ट बँकमध्ये जगभरातले तिसरे सर्वात वेतन मिळवणारे सीईओ बनले होते. परंतु त्या कंपनीच्या संचालकांबरोबर वाद झाल्यानं निकेश अरोरा यांनी राजीनामा दिला होता. आता ते अमेरिकेतल्या पालो आल्टो नेटवर्क्स इंकचे सीईओ आणि चेअरमन बनले आहेत.

निकेश यांना जगभरातल्या सर्वात मोठ्या सायबर सिक्युरिटी सॉफ्टवेअर निर्माता कंपनीचे सीईओ म्हणून 858 कोटी रुपयांचं पॅकेज मिळालं आहे. त्यामुळे जगभरात सर्वाधिक वेतन मिळवणारे ते पहिले सीईओ बनले आहेत. जवळपास 19 बिलियन डॉलर ब्राँड व्हॅल्यू असलेल्या कॅलिफोर्निया स्थित पालो नेटवर्क्स कंपनीची जगभरातल्या जवळपास 50 हजार कंपन्यांबरोबर भागीदारी आहे. यात 5 हजार कर्मचारी कार्यरत आहेत. परंतु निकेश यांना 858 कोटी रुपयांबरोबरच कंपनीचे शेअर्सचा भाव चार पटीनं वाढवण्याचं टार्गेटही देण्यात आलं आहे. निकेश कंपनीचे मागील सीईओ आणि चेअरमॅन मार्क लाफलिन यांची जागा घेणार आहेत. लाफलिन हे कंपनीचे जगभरातले 5वे सर्वाधित वेतन घेणार कार्यकारी संचालक होते. अरोडा यांचा वार्षिक पगार 12.8 कोटी डॉलर असणार आहे. म्हणजेत भारतीय चलनात तो 857 कोटी रुपये असणार आहे. निकेश पालो अल्टोच्या शेअर्सची किंमत 7 वर्षांत 300 टक्क्यांना वाढवण्यात यशस्वी झाल्यास त्यांना 442 कोटी रुपये अतिरिक्त मिळणार आहेत. निकेश यांच्याआधी अॅपलचे सीईओ टीम कुक टेक्नॉलॉजीच्या जगात सर्वात जास्त पगार घेत होते. त्यांच्या वार्षिक पगार 119 मिलियन डॉलर एवढा होता. निकेश यांनी 2019मध्ये गुगलला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्यांच्याकडे 50 मिलियन डॉलरचं पॅकेज होतं. निकेश हे 2004 आणि 2007मध्ये गुगलच्या युरोप ऑपरेशनचे प्रमुख होते. निकेश 2011मध्ये गुगलचे चीफ बिझनेस ऑफिसर झाले. निकेश अरोडा यांचा जन्म 6 फेब्रुवारी 1968 रोजी उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथे झाला. ते आता 50 वर्षांचे आहेत. निकेश यांचे वडील इंडियन एअरफोर्समध्ये ऑफिसर म्हणून कार्यरत होते. निकेश यांनी 1989मध्ये बीएचयू आयटीमधून इलेक्ट्रॉनिक इंजिनीअरिंग पूर्ण केलं.  

Web Title: Ghaziabad's Nikesh has a package of 858 crores, CEO of the world's number 1 cyber security company.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.